पान:देशी हुन्नर.pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८२ ]

 या पिंपांत चुना व गूळ हे दोन पदार्थ टाकतांना त्यांचें बसस्तान बरोबर बसण्याविषयीं पुष्कळ काळजी घेतली पाहिजे. या गोष्टीकडे दुर्लक्ष झालें कीं पिंपांतील रंग कुजून त्यास सडलेल्या मासळीसारखी घाण येऊं लागते, व तो फेंकून द्यावा लागतो,

रंग वैचित्र्य.

 एकाच कापडावर अनेक प्रकारचे रंग चढविण्याच्या दोन रीति आहेत. एक ठशानें छापावयाची व दुसरी बांधणीची.

 ' छापणी '--याचे तीन प्रकार आहेत.

( अ ) अनेक तऱ्हेचे रंग घेऊन ते ठशांच्या योगानें कापडावर उठवावयाचे.
( ब ) कापडावर चिकट पदार्थानें नक्षीचे ठसे उमटवून त्यांच्यावर सोनेरी किंवा रुपेरी वर्ख चिकटावयाचा.
( क ) खडी नामक एका प्रकारचें चिकट रंगारंगाचे लुकण करून त्याची नक्षी कापडावर वठवावयाची, किंवा नुसत्या पांढऱ्या खडीनें नक्षी छापवून त्याजवर अभ्रकाची पूड बसवावयाची. खडीच्या रंगाची कलमानें कापडावर नक्षी काढावयाची.

 बांधणी--नखानें कापडाचा बारीक भाग चिमटीनें धरून त्याजवर सूत गुंडाळून दशअवतारी गंजिफ्यांतील कृष्णाच्या असलेल्या वाटोळ्या वलयाकार बिंदूप्रमाणें, एक आकृति तयार करावयाची अशा वलयाकार बिंदूच्या मालिकांनी फुलें, वेल, वगैरे सोडवून कापड रंगांत बुडवावयाचें. अशा रीतीनें तयार केलेलें कापड रंगांत बुडविलें ह्मणजे त्यास जेथें जेथें दोरा बांधलेला असतो तेथें तेथें रंग चढत नाहीं इतर ठिकाणीं मात्र चढतो. त्यामुळें रंगविलेला कपडा सुकवून त्यास बांधलेले दोटे तोडून टाकिले ह्मणजे मोक्तिक मालाकृति नक्षी दिसूं लागते. अशा प्रकारानें होत असलेल्या कामास 'बांधणीचें' काम असें नांव आहे.

 छापणी--कापडावर रंगारंगाची नक्षी छापण्याकरितां सागाच्या लांकडाचे कोरून ठसे तयार करावे लागतात. लांकडाच्या एका चौकोनी उथळ कुंडींत