पान:देशी हुन्नर.pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७९ ]

कुणकाआल या नांवानें प्रसिद्ध असलेली एक सुरंगी मुंबईत मिळते. तिची पूड एक रत्तल व पाणी चार शेर हीं एकत्र करून त्यांत कापड घालून तें तीन तासपर्यंत उकळवावें. मग तें पाणी निघालें ह्मणजे तें कापड धुवून सुकवावें.

 नंतर दुसऱ्या दिवशीं अर्धा रत्तल बाभळीचा गोंद व चार शेर पाणी एकत्र करून त्यांत तें कापड बुडवून सुकवावें व त्याजवर कुंदी करावी. हें कापड बहुतकरून ब्रह्मदेशांत जातें.

काळारंग.

 सिंध, कच्छ, आणि काठ्यावाड या प्रांतीं खनिज पदार्थापासून काळारंग होतो त्याचें वर्णन करणें अवश्य आहे.
 कायोनो काळोरंग-कावेचा काळा रंग, या रंगांत गेरू सारखा तांबूसपणा मारतो, त्याची कच्छ देशांतील बायकांना फार आवड आहे; त्या या रंगाचें पातळ नेहमीं वापरतात; व लग्न कार्य आणि सुतकांतसुद्धां त्याचाच उपयोग करितात. रेशमी अथवा सुती या दोन्ही जातीच्या कपड्यांवर हा रंग चढवितां येतो. कायो (ह्मणजे काव) या नांवाची एका प्रकारची माती कच्छ प्रांतीं फटकीच्या खाणी आहेत त्यांत सांपडते, तिचा रंग पिवळट असतो परंतु ती भाजली ह्मणजे तोच तांबडा होतो; ह्या मातींतच सुवर्णमुखी सांपडतो, तिच्यामुळें तीं कच्या हिराकसाची ( Sesquisulphate of Iron ), भेळ असतें. मागें सांगितलेले हर्डा चढविलेलें कापड घेऊन जाळळेल्या कावीच्या पाण्यांत बुडविलें ह्मणजे ते लागलेच काळें होतें. या प्रमाणें रंग दिल्यावर कापड धुवून वाळवितात. कच्छी बायकांच्या अशा प्रकारें रंगविलेल्या पातळांस कच्छी भाषेंत 'साडला' किंवा 'चोरासा' ह्मणतात.
 मस्यो काळो रंग--ह्मणजे मसी सारखा काळा रंग, हा रंग लोखंडासारखा दिसतो. हाही कच्छ प्रांतीं होतो. हा तयार करण्याची रीती अशी आहे, लोखंडाच्या कढईत खिळे व पाणी घालून उकळवितात; व तें पाणी तीन दिवस तसेंच ठेवून नंतर गाळून त्यांत फटकी व मोरचूत घालतात. या तयार केलेल्या पाण्यांत हर्डा चढविलेलें कापड बुडविलें ह्मणजे तें काळेंभोर होतें.

गुळीचे रंग.

 मुंबई जवळ दादरास गुळीचा रंग पुष्कळ होतो. रंगारी लोक रंग पिंपांत