पान:देशी हुन्नर.pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७५ ]

बुचकळून सुखवावें हाच प्रकार तीन दिवस चालवावा. चौथ्या दिवशीं तेंच स्वच्छ पाण्यांत आघळून पुढें साहा दिवस ओपवावें व अखेरीस धुवून सुखवावें. खारणी करण्यांत जितकी मेहनत घ्यावी तितका रंग चांगला वठतो.

 २ हर्डाववूं--हर्डा चढविण्यास खालीं लिहिलेल्या जिनसा लागतात:--

 हर्डा,  तमालपत्र.‎
 नागकेसर,  मायफळ,
 हिमाज,(बाळहर्तकी)    कुर्फो, ( जाडी दालचिनी)
 साखर,  पाणी,

 या सर्व जिनसांची बारीक वस्त्रगाळ पूड करून थंड पाण्यांत टाकून पुष्कळ कालवावी, व तिच्यांत पूर्वी खारलेलें कापड बुडवून सुखवावें ( हें कापड छापून त्याचें जाजम वगैरे करणें असेल तर त्याची खालींल बाजू ( ह्मणजे जमिनीकडील बाजू ) वर करून तिजवर छापावें ह्मणजे सूर्याच्या किरणांनी सुखलेल्या बाजूपेक्षां खालच्या बाजूवर रंग चांगला वठतो )

 ३ पासाकरवो--लोध्र पाण्यांत चार तासपर्यंत उकळवून तयार झालेल्या काढ्यांत तुर्टी टाकावी व तें पाणी गाळून त्यांत कापड बुडवून सुकवावें.

 काही रंगारी लोध्राबरोबर पतंगाचें लांकूडही पाण्यांत उकळवितात. परंतु असें करण्याची कांहीं गरज नाहीं.

 ४ विच्छळवूं-थंड पाण्यांत कापड बुडवून पुष्कळ आघळून चुबकून धुवावें.

 ५ रंगववू-जमिनींत खाडा खणून, त्याच्या बाजूस लांकडे घालण्याकरितां भुयारासारखें भोंक पाडून, त्याजवर ' चेरू' या नांवानें प्रसिद्ध असलेलें एक मोठें तांब्याचें भांडें ठेवून त्यांत मंजिष्ट, धायटीचीं फुलें, व मायफळ या तीन पदार्थांच्या वस्त्र गाळ पुडी टाकाव्या. या भट्टींत कापड टाकून तीन तास उकळवावें ह्मणजे त्याजवर पक्का तांबडा रंग चढतो. या रंगास जास्ती झळक मारावी ह्मणून कधीं कधीं भट्टींत 'सुरंगी' या पदार्थाची पूड टाकितात परंतु तीच पूड जास्ती पडली तर रंग फिक्का पडून पिंवळट दिसूं लागतो.

 ६ तापववूं--रंगविलेले कापड विकण्याकरितां बाजारांत पाठविण्यापूर्वी तें उन्हांत टाकून ओपवावें लागतें. बकरीच्या लेंड्या पाण्यांत कालवून त्यांत तें एकरात्र भिजत ठेवितात, दुसरे दिवशीं सकाळीं तें तसेंच जमिनीवर उन्हांत पसरून त्याजवर वारंवार पाणी शिंपडतात. याच प्रमाणें तिसरे दिवशीं काप-