पान:देशी हुन्नर.pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १७२ ]
रंगाचे प्रकार.

 वेगळे वेगळे रंग देण्याचें काम भिन्न भिन्न जातीचे लोक करितात. गुळीचा रंग करणारे लोक जातीचे मुसलमान आहेत. व ते निळा, काळा, आणि हिरवा इतकेच रंग तयार करितात. सुरंगीपासून पक्का तांबडा रंग करणारे वेगळे आहेत. जाजमें, रजया, वगैरेचें काम हेच लोक करितात. हे जातीचे हिंदु आहेत. रंगविणारे वेगळे आहेत. हे लोक हिंदु असून मूळचे सिंध आणि कच्छ प्रांतांतले राहणारे आहेत. या खेरीज रेशमाच्या कापडावर बांधणीचें काम करणारे मुसलमान लोक आहेत ते वेगळेच. कच्छ, काठ्यावाड, गुजराथ ह्या तीन प्रांतांत बांधणीच्या कामास गिऱ्हायकी फार त्यामुळें पावसाळ्या दिवशीं काम धंद्याकरितां बाहेर जातां येत नाहीं ह्यामुळें बायका पुरुष घरीं काम करित असतात. याखेरीज पागोटीं रंगविणारे हे वेगळेच आहेत. हे लोक जातीचे बहुत करून मुसलमान आहेत. पागोट्यांस रंग देण्यांत कुसुंब्याचाच पुष्कळ उपयोग होतो. कुसुंब्याचा रंग कच्चा आहे तरी त्याचे मोतियापासून तेलिया रंगापर्यंत चौदा पंधरा प्रकारचे भिन्न भिन्न सुशोभित रंग तयार होतात. या रंगाची प्रतिष्ठा उत्तरेकडे जास्ती आहे. लखनौ, बनारस, दिल्ली, आग्रा, इत्यादि ठिकाणच्या लोकांस रंगी बेरंगी कपडे घालण्याची हौस फार त्यामुळें धंद्यास तेज आहे. इराणी लोकांस लागणारे हिरवे व पिवळे कपडे हेच लोक रंगवितात.

 मुंबईत लोंकर रंगविणारे कांहीं रंगारी आहेत तरी हा धंदा मुख्यत्वेंकरून काश्मीरी व पंजाबी लोकांचाच आहे. कारण या दोन देशांतच लोंकरीचे कपडे पुष्कळ विणिले जातात.

 या खेरीज हस्तिदंत रंगविणारे पारशीलोक मुंबईत पुष्कळ आहेत. हस्तिदंतावर सहा सात जातीचे रंग चढतात.

 या शिवाय कातडे रंगविणारे (कमावणारे नव्हत ) लोक आपल्या देशांत आहेत ते वेगळे.

 जाजम, रजई, चांदणी, गुजराथी बायकांच्या साड्या, वगैरेवर रंगारंगाची नक्षी छापणारे लोक आहेत त्यांस गुजराथेंत भावसार ह्मणतात. हे भावसार लोक बऱ्हाणपुराकडचे आहेत, असें ह्मणतात.जोधपुरचे मारवाडी लोक,पंजाबांतील नानकपंथीलोक, सोलापूर व तैलंगण येथील कांहीं लोक जाजमे छापण्याचा धंदा करितात. गुजराथ, काठयावाड,कच्छ, व सिंध या प्रांतीं खत्री लोकही हें काम करितात. तरी कांहीं ठिकाणीं मुसलमान लोकही हा धंदा करूं लागले आहेत. परंतु