पान:देशी हुन्नर.pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६७ ]

प्रदेशांत कपडे करण्याची चाल आहे. पंजाबांत मेंढ्याच्या लोंकरीचे हातमोजे, पायमोजे गळपट्टे, नमदा (बुरणूस) आणि खोगीर हे पदार्थ तयार होतात. जयपुरास नमद्याच्या टोप्या तयार करितात आणि अजमीरास जाट लोकांच्या बायकां करितां लागणाऱ्या घागऱ्यांचे कापड तयार करतात. राजपुतान्यांत बिकानेर येथील पांघरण्याच्या धाबळ्यांची मोठी प्रसिद्धि आहे. जोतपूरास जाट आणि वैष्णव लोकांच्या बायका लोंकरीचे कपडे विणीत असत, परंतु आलीकडे इंग्रजी कापड येऊं लागल्यामुळें त्याचें मान कमी होत चाललें आहे.
 कपडे विणण्याच्या कौशल्यसंबंधानें पाहतां तिबेट देशांत व अशियाखंडांतील मध्यभागाच्या प्रदेशांत असलेल्या एका प्रकारच्या बोकडाच्या लोंकरीचें कापड याचीच गणना केली पाहिजे. काश्मीरी शाल व पश्मीना असे लोंकरीच्या कापडाचे दोन प्रकार आहेत. शालींतच एक कशिदा काढलेली व एक आंगच्या नक्षीची असे दोन मुख्य प्रकार आहेत. शाल साधी असली, व तिजवर कोणत्याही प्रकारची नक्षी नसली, ह्मणजे तिला "अल्वान" किंवा " याकतारा" असें ह्मणतात. रामपूर चादर ह्मणून एक साध्या शालीचा प्रकार आहे. रामपूर चादर किंवा रामपूर शाल हें कापड लोंकरीच्या केंसांचे एकेरी तंतू घेऊन याचें विणलेलें असतें त्या शाली तांबड्या, पांढऱ्या व इतर रंगाच्या असतात परंतु त्यांस कांठ व पदर अगदीं क्वचित् असतात. अलीकडे स्वस्त मालास गिराइकें फार त्यामुळें काबूल देशांत " वाहापूशाई " नांवाची हलकी लोकर निघते, ती आणवून हलक्या किंमतीचे कपडे तयार करितात. उत्तर सतलज प्रांतीं बसाहीर नावांचें एक डोंगराचे खोरें आहे, त्यांतील मुख्य शहर रामपूर येथून पूर्वी उत्तम शाली व धाबळ्या विकण्या करितां लुधियाना येथें जात असत. त्याच ठिकाणांतून हल्लीं पशम चादरी येतात, तरी रामपूर चादर हेंच नांव त्यांस पडलें आहे. पश्मीना हें कापड रिठ्याच्या पाण्यात बुडवून पुष्कळ वेळ चुबकून धुतलें ह्मणजे तें आटून घट्ट होते व त्याच्या अंगी मऊपणा जास्ती येतो तेव्हां त्यास मलिदा असें ह्मणतात. मलिद्याचे चोगे, टोप्या, कबजे, गळपट्टे इत्यादि पदार्थ काश्मीर,अमृतसर,व लुधियाना येथें तयार होतात. काश्मीराशिवाय अमृतसर, लुधियाना,लाहोर,शिमगा,नूरपूर कांग्रा जिल्ह्यांत तिलोकनाथ गुजराथी जिल्ह्यांत जलालपूर, व गुर्दासपूर जिल्ह्यांत 'निदानगर' या ठिकाणींही पश्मानी तयार होतो तरी तो विणणारे सर्व लोक काश्मीरीच आहेत. पश्मीन्याचे दुपेटे,लुंग्या,हातमोजे