पान:देशी हुन्नर.pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५८ ]

फार आवड आहे त्यामुळें हिंदुस्थानांतील कारागिरांनीं कोणाच्या मदती वाचून स्वतःच्याच बुद्धीनें जे जिन्नस तयार केले जातात, ते जिन्नस पुष्कळ लोकांच्या विचारें फारच लौकर तयार करून स्वस्त विकणाऱ्या पाश्यात्यांकडे हिंदुस्थानी कारागिरानें आपले अधिकार सोंपविल्यामुळें घडतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं." हे मेहेरबान वार्डल् साहेबांचे विचार लक्षपूर्वक वाचण्याजोगे आहेत.

 बंगाल प्रांतीं भागीरथीच्या कांठीं पुराच्या योगानें तयार झालेली हजारो एकर मळईची जमीन आहे तींत हे रेशमाचे किडे अतिशय उत्पन्न होतात. त्या प्रांती माल्डा, बोगरा, राजशाई, मुरशिदाबाद, बीर भूम, आणि बर्द्वान, या ठिकाणीं रेशमी कपडें फार चांगले होतात. सन १५७७साली माल्डा येथून शेख भिक नांवाच्या मनुष्यानें तीन गलबतें भरून रेशमी कापड इराणी आखातांतून रशिया देशांत पाठविलें, असा इंग्रज सरकारच्या दप्तरीं लेख आहे. बांकुरा व मिडणापूर या गांवीं ही रेशमी कापड पुष्कळ तयार होतें. बंगाल्याच्या पश्चिम भागीं मानभूम,सिंगभूम, आणि लोहारडागा या गांवीं टसर,या जातीच्या रेशमाचे कपडे होतात.एरी नांवाचे रेशीम हिमालयाच्या पायथ्याजवळ ह्मणजे उत्तर बंगाला व आसाम या ठिकाणी उत्पन्न होतें. 'मुगा' या नांवाच्या रेशमाची उत्पत्ति फक्त आसाम प्रांतीच आहे. रेशमी कपडा धुतलेला नसला ह्मणजे त्यास 'कोरा' ह्मणतात, व तो धुतला ह्मणजे त्यास 'गरद' ह्मणतात. कदास कांठ असले ह्मणजे त्यास धोतर ह्मणतात. स्त्रिया अंगावर बुरख्यासारखें जें रेशमी वस्त्र घेतात त्यास चादर म्हणतात. पासोडासारखा पांघरण्यास जो रेशमी कपडा घेतात त्यास लुंगी म्हणतात. हे कपडे तुतीच्या झाडांवरील किड्यांपासून झालेल्या मलबारी रेशमापासून झालेले,अगर टसर रेशमापासून झालेले असतात. एरी रेशमाचे कापड प्रथम राठ लागतें परंतु तें वापरूं लागलें म्हणजे उत्तरोत्तर नरम होत जातें. मुगा रेशीम जाडें असतें खरें परंतु त्याचा धागा फार चिवट असल्यामुळें लौकर तुटत नाही. मलबारी रेशमाच्या किडयांचे जे कोश असतात त्यांतून किडे पंख फुटून उडून गेल्यावर त्या काशाच्या रेशमाचे मुकटे करितात. त्यांस हिंदु लोक इतर रेशमी कपडयांपेक्षा फार पवित्र मानितात. कारण त्या रेशमाचा उपयोग करतेवेळीं प्राण्याची हिंसा होत नाहीं. जैन लोक व वैष्णव अशा रीतीचें कपडे मुद्दाम तयार करवून वापरितात. मलबारी रेशमांत पिवळें व पांढरें असे दोन प्रकार आहेत, त्यांतील पिवळ्या प्रकारचें रेशीम पुष्कळ