पान:देशी हुन्नर.pdf/152

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[ १५४ ]

पांडवखं, चिट्टलपखं व कलहस्त्री संस्थानांत कत्रवरं आणि तिंपंटकपुरें या गांवचे पारिया नांवें प्रसिद्ध जातीचे लोक हें बारीक सूत काढितात. त्यांची काम करण्याची रीत अशी आहे कीं, कापसाची बोंडे घेऊन त्यांतील धागे बोटानें बाहेर ओढून काढून त्याची रास करितात. नंतर ती रास काठीनें धोपटतात. आणि खालीं पडलेला कापूस गोळाकरून केळीच्या वाळविलेल्या खोपटांत गुंडाळून ती पुडी चारपांच ठिकाणी दोरीनें बांधून एका बाजूस ठेवितात. याप्रमाणें सगळ्या कापसाच्या पुड्या बांधून तयार झाल्यावर सूत काढण्याच्या हातराहाटानें त्याचें सूत काढतात. तेव्हां तो कापूस पुडीनेंच धरितात. तेणेंकरून तो मलीन होत नाहीं. सूत तयार झाल्यावर त्याची मलमल विणण्यास तीन मनुष्य लागतात. एक माग चालविण्यास, दोन मनुष्य मागाचे दाेनी बाजूंस बसून धोटें इकडून तिकडे देण्यास, अशा रीतीनें तयार झालेल्या मलमलीच्या ताग्याची लांबी १६ वार असते व रुंदी दीडवार असते व एका ताग्यास २५-२०० रुपयें पर्यंत किंमत पडते. अरणी गांवी इतकें बारीक काम करणारे कारागीर फारच थोडे आहेत. उंची मलमल धुतांना दगडावर आपटीत नाहींत. जाड्या कापडांत धुतलेली रेती बांधून तिचें गाठोडें घट्ट दगडासारखें बांधून त्यावर धुतात, व नदीचे वाळवंटांत खळगे खणून त्यात जमलेल्या स्वच्छ पाण्याचा त्या धुण्यास उपयोग करितात. नंतर तो कपडा आठभाग पाणी १ भाग थुंबई नांवाच्या झाडाचा चीक ५ पोलम् कळीचा चुना हीं एकत्रकरून त्यांमध्यें तें कापड तीनतास पर्यंत उकळतात. मग तें पाण्यांत आदळून पुन्हा त्या रेतीच्या गाठोड्यावर चुबकून चुबकून धुऊन तें दोन दिवसपर्यंत उन्हांत ओपवितात. नंतर स्वच्छ पाण्यांत एकवार उकळतात आणि तें लिंबाच्या रसांत बुडवून ठेवितात. दुसरे दिवशीं सकाळीं पुन्हा स्वच्छ पाण्यांत आदळून रेतीच्या दगडावर चुबकून पुन्हा ओपवितात. याप्रमाणें दहा दिवस मेहेनत केली ह्मणजे मलमल पांढरी सफेत होते. हें मलमल धुण्याचें काम जरी धोबीलोक करितात तरी साळीलोक तो कपडा खराब न होण्यासाठीं त्या धोब्यावर सक्त नजर ठेवतात. मग त्यास खळ देणें ती ते साळी स्वतःच देतात. तेव्हां कपडा खळींत बुडवून वाळवितात. याप्रमाणें ५ दिवस केलें ह्मणजें साहाव्या दिवशीं त्यास हातानें खळ लावितात. आणि वाळवून त्याच्या घड्या करून ठेवितात. मलमल विणून तयार झाल्यापासून तिची घडी होईपर्यंत २० दिवस लागतात,