पान:देशी हुन्नर.pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५३ ]

विण्याकरितां तोडून नेले. अलीकडे मात्र या देशांत विलायती सुत पुष्कळ येऊं लागल्यामुळें व खुद नागपुरासही सुताची गिरण निघाल्यामुळें हातानें सूत कांतण्याची विद्या उत्तरोत्तर लयास जात आहे. गिरणींतील कापड महाराष्ट्र देशांतील उंचवर्णांच्या लोकांस नापसंत आहे त्यामुळें चांगलें कापड मात्र नागपुराकडे अजूनही तयार होतें. त्यांत नागपूरच्या धोतरजोड्यांची विशेष कीर्ति आहे. अलीकडे धोतरजोडे न विणतां नुसते नागपुरी रेशमी कांठच विलायती कपड्यास शिवून ते वापरण्याची चाल पडतचालली आहे. भंडारा येथील डिपुटी कलेक्टर साहेबाच्या रिपोटीवरून असें कळतें कीं, गेल्या दाहा अकरा वर्षात सूत कातण्याचें काम दिवसेंदिवस फारच कमी होत चाललें आहे. अलीकडे काम थोडें होतें इतकेंच नाहीं तर तें फार हलक्या प्रतीचें ही असतें. पावणी यागांवीं पूर्वी फार उत्तम मंदील होत असत व भंडाऱ्यास पागोटीं आणि उपरणीं फार चांंगलीं होत असत, त्यादोनही जिनसा आलीकडे मुळींच थोड्या निघतात आणि त्याही हलक्याप्रतीच्या. नागपुरास रेलवे झाल्यापासून तर त्याप्रांतीं उंची कापड उत्तरोत्तर दुर्मिळच असें समजलें पाहिजे. शेतकरी व इतर धंदा करणाऱ्या लोकांस लागणारे जाडेंभरडें कापड पूर्वीपेक्षां जास्ती तयार होतें. हुसंगाबाद येथील डिपुटी कलेक्टर साहेबांनी आपल्या रिपोर्टांत असें लिहिलें आहे कीं, त्यागावीं पूर्वी ११६ साळी होते तें हल्लीं २१६ झाले आहेत. हरडा येथील एका कामदारानें असें लिहून पाठविलें आहे कीं, यागांवीं पूर्वीपेक्षां सुती कापड हल्ली जास्ती होतें. विलायती कापडापेक्षां देशी कापड विशेष टिकाऊ आहे त्यामुळें गरीब लोक तेंच वापरतात.
 मद्रास इलाख्यांत अरणी येथें फार बारीक मलमल तयार होते तत्रापि तिला गिऱ्हाईक कमी असल्यामुळें माल फारच कमी निघतो. अलीकडे तर मुद्दाम काढविल्या शिवाय उंची मलमल मिळेनाशीच झाली आहे. ही मलमल विणण्याबद्दलची खालीं दिलेली माहिती डाक्टर बिडी साहेबाच्या पुस्तकांतून घेतली आहे.
 पारुथी गांवीं कापसाचीं झाडें लाऊन तीं पांच वर्षांचीं झालीं ह्मणजे मग त्यांजवरील कापूस काढून त्याचा बारीक सुताकडे उपयोग करितात. पांच वर्षांपूर्वीच्या कापसाचें सूत जाडें निघतें. या पांच वर्षां नंतरच्या झाडांचे तंतू इतके बारीक असतात कीं, त्यांचें चिंगलपट या गांवच्या कसबी लोकांसही सूत काढण्यास कठीण पडतें. ट्रिव्हेलोर तालुक्यांत चेरिवी, इरुगलं, कुलाडं,