पान:देशी हुन्नर.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४७ ]

वतवाडी येथील वाळ्याचे पंखे फार प्रसिद्ध आहेत. पुण्यासही वाळ्याचे पंखे होतात. बिकानेर संस्थानांत रेणीग नांवाच्या गांवीं वाळ्याचे पंखे करून त्यांस हस्तिदंताच्या मुठी लावितात, वाळ्याचे पंखे करण्याचें काम फार कठीण नाहीं. बांबूच्या ताटींत वाळा बसवून तो दोऱ्यानें शिवून त्याजवर मखमल, कलाबूत, बेगड, टिकल्या, इत्यादिकांच्या योगानें तऱ्हेतऱ्हेची नक्षी टांचून सभोंवतीं जाळीच्या अथवा साध्या कापडाची किंवा मोरांच्या पिसांची झालर लाविली ह्मणजे झालें. पंख्याच्या दांड्या कातारी लोक तयार करितात. ह्मैसूर प्रांतीही वाळ्याचे पंखे होतात. ह्यांची झालर वाळ्याचीच असून तिजवर मयूरपुच्छादिकांची नक्षी असते. ह्मैसूरांत पंख्याच्या दांड्या चंदनाच्या करितात व त्याजवर पुष्कळ नक्षी असतें. झाशी, एटवा आणि आग्रा, या गांवीं मोरांच्या पिसांचे पंखे तयार होऊन विकण्याकरिता कलकत्त्यास जात असतात.

 मद्रास इलाख्यांत कडाप्पा जिल्ह्यांत चितवेल गांवीं ताडाचे पंखे तयार होतात, तसेंच तंजावर गांवींही होतात. तंजावर येथील माल फार सुरेख असतो, व त्यास अभ्रकांची सालर असतें. आणि त्यांच्या दांडयावर रंगारंगाचें कांचेचें तुकडे बसविलेलें असतात.कडाप्पा जिह्यांत नोसनगांवीं एकाप्रकारचे कागदांचे पंखे होतात त्यांजवर अगदीं पातळ कापड चिकटविलेलें असतें. ताडाच्या पानांत असलेल्या शिरांप्रमाणें बांबूच्या काड्या सारख्या लावून त्यांजवर पहिल्यानें कागद चिकटवून मागावून कापड चिकटवितात व त्याजवर रंग देतात. यारंगांतच तऱ्हेतऱ्हेचीं चित्रें काढून व सोनेरी वर्खाचा उपयोग करून सुशोभित नक्षी बनवितात. यापंख्याच्या एका बाजूस मोरांच्या पिसांचे डोळे काढण्याची व दुसऱ्याबाजूस फुलें वगैरे काढण्याची चाल आहे. प्राचीनकाळीं तंजावर गांवीं अभ्रकाचे फार चांगले पंखे होत असत परंतु अलीकडे हलके काम फार निघू लागले आहे. तंजावरास बेगड चिकटविलेलें कापडाचें पंखेही तयार होतात. गंजम जिल्ह्यांत कालीकोट गांवीं पंखे तयार होतात.

 मद्रासइलाख्यांत ताडपत्रीच्या छत्र्या प्राचीनकाळीं होत असत, परंतु इंग्रजी छत्र्या देशांत येऊ लागल्यापासून ताडपत्रीच्या छत्र्या नाहींशा होत चालल्या आहेत. ताडपत्रीची, पळसाच्या पानाची, किंवा इतर कांहीं जातीच्या पानांची इरली मुंबई इलाख्यांत तयार होतात. पुणें प्रदर्शनांत कोल्हापूर येथोन एक इरलें आलें होतें