पान:देशी हुन्नर.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[ १४३ ]

मद्रास इलाख्यांत कोठें कोठें होतात. जयपुरासही कातड्याच्या गंजिफा चांगल्या होतात. तेथील एक उत्तम कारागीर थोड्या दिवसापूर्वी मरण पावला.


प्रकरण १३ वें.
टोपल्या, करंडया, वगैरे बुरडी कामासारख काम.

 प्राचीन काळापासून बांबू, वेत, बोरू, देवनळ, गवत, व ताड, माड, आणि खजूरी यांचीं पानें या पदार्थांचा टोपल्या वगैरे करण्याकडे उपयोग होत आला आहे. याच पदार्थांचा अझून ही उपयोग होतच आहे. बिडी तालुक्यांत वेताचें पेंटारे फार चांगले होतात. यापेटऱ्यांवर कातडें चढवून तें सरकारी दफतरें व खाजगी कपडे ठेवण्याकरितां स्वारति फिरविण्याची चालपडली आहे. अलीकडे पेटारे आस्ते आस्ते नाहींसे होऊन त्यांच्या बदला विलायती पोर्टमान्टोंची किंवा जस्ती पेट्याची योजना होत चालली आहे. बायकांच्या कुंकवाच्या करंड्या, पूर्वी बांबूच्या किंवा वेताच्या होत असत. अलीकडे लांकडाच्या होऊं लागल्या आहेत; तरी अझून सुपें, टोपल्या, व रोवळ्या, वगैरे पुष्कळ जिनसा घरोंघर दृष्टीस पडतात. सांवतवाडीस बांबूच्या करंड्या तयार करून त्यांजवर कापड चढवून, त्या कापडावर नक्षीकाढून तिच्यावर लांख-चढविण्याची चाल आहे. असल्या लहान लहान करंड्या, सुपल्या, व रोंवळ्या मुलींच्या खेळांत दृष्टीस पडतात. अलीकडे सरकारी तुरुंगातून असलेल्या चिनई कैदी लोकांनीं तयार केलेल्या वेताच्या करंड्या जिकडे तिकडे मिळतात. यांतील कांहीं जन्मठेपीच्या कैदीस मुंबईत काळवादेवीच्या रस्त्यांवर दुकानें काढण्याची परवानगी मिळाली आहे. पुणें येथील प्रदर्शनांत कच्छ भूज येथून वेताच्या करंड्या आल्या होत्या त्या सुरेख व फार स्वस्त असल्यामुळें लवकरच लोकांनी विकत घेतल्या. सांवतवाडी, मुंबई, व पुणें या तीन गांवीं वाळ्याचे डबे करून त्यांजवर कलाबतूची, टिकल्यांची, व माशाच्या पंखांची नक्षी करितात. हे डबे पाश्चिमात्यांस फार प्रिय झाले आहेत. वाळ्याचे पंखें करून त्यांजवर ही कलाबतूंची, टिकल्यांची, व माशाच्या पंखांची नक्षी क-