पान:देशी हुन्नर.pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२४ ]

“वेलबुट्टी व चित्रें यांची मिसळ,तलवारीच्या मुठी,कागद कापावयाच्या सुऱ्या व टेबलावर ठेवण्याचें नक्षीचें सामान यांत केलेली असते.मूर्ति गौतमाच्या होतात. मौलमीन गांवीं उत्तम करागीर तीन आहेत. रंगून येथे दोन तीन आहेत व सगळ्या देशभर मिळून आणखी कांहीं थोडे आहेत. अगदीं लांकडावर होत असलेल्या कामाप्रमाणें सुरेख काम करणारा असा सगळ्या ब्रह्मदेशांत एकच कारागीर आहे. याचें नांव माऊंग नियायिंग. हा मौलमीन येथें राहतो. इतर कारागिरीचें काम इतकें चांगलें असत नाहीं. त्यांनीं सोडविलेल्या पत्त्यांत खाचाखोची रहातात व चित्रें बेढब असतात. ब्रह्मी लोकांनीं तयार केलेल्या धांव नामक हत्याराच्या मुठी सर्व प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बाहेरून वेल व फुलें सोडविलेली असतात. वेलांच्या फटीतून ह्मणजे जाळींतून हत्यारें आंत घालून मधला गाभा पोकळ करून त्यांत माणसांचीं चित्रें खोंदतात. त्या चित्रांकडे पाहिलें ह्मणजे ती बाहेरून खोदून नंतर आंत बसविलेलीं आहेत असा भास होतो. परंतु खरी स्थिति अशी नाहीं. हस्तीदंताचा गाभा अशा रीतीनें खोंदून तयार करितांना पुष्कळ कारागीर दृष्टीस पडतात. हा मौलमीन येथील कारागीर नेहमीं सयामच्या राजाचें काम करीत असतो; व पूर्वीही ब्रह्मदेशच्या राजाचें आणि श्यान सरदारांचें काम करीत असे. ह्या राजेलोकांकरितां खुर्च्या, सिंहासने, उभा कोंरलेला सगळा दांतच्या दांत, व बुधाच्या मूर्ति ह्या जिनसा तयार होतात. त्यानें ब्रह्मदेशाच्या माजी राजा करितां एक हांतरी केली होती. ती गुंडाळून ठेवितां येत असे. हत्तीचे दांत अप्पर-ब्रह्मदेश व सयाम या देशांतून येतात.

 नेपाळांत कोठें कोठें देवाच्या मूर्ति, फण्या, फांसे, चोपदाराच्या कांठ्या, व "कुकरी" ह्मणजे जंबियाच्या मुठी इत्यादि जिनसा होतात.

शिंगाचें सामान.

 प्राचीन काळापासून अर्घ्ये, संपुष्टें, गोमुखाचीं शिंगें, व वाद्यें इत्यादि पदार्थ शिंगापासून करण्याची वहिवाट आहे, चाकूच्या व जंबियाच्या मुठी आणि बाणाची टोंकें हीही कधीं कधीं शिंगाचींच करितात. खढ्गपात्राचा ह्मणजे गेंड्याच्या शिंगाचा प्याला पाणी पिण्यास पवित्र मानिला आहे. आलीकडे मात्र शिंगें विलायतेस जाऊं लागलीं. विजयदुर्ग, जैतापूर, मालवण, व सांवतवाडी या ठिकाणीं गव्याच्या शिंगाचें काम फार चांगलें होतें. तीस वर्षापूर्वी देव-