पान:देशी हुन्नर.pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०८ ]

जवर केलेल्या कामाची शैली वेगळ्या तऱ्हेची आहे. ती अशी:-लांकूड साफ करुन त्याजवर मातीचा एक थर द्यावयाचा; व तो सुकला ह्मणजे त्याच्यावर भोंकें पाडलेले नक्षीचे कागद ठेऊन रांगोळ्याप्रमाणें कोळशाच्या पुडीची नक्षी उठवितात. या नक्षींत खारीच्या शेपटीच्या केसाच्या कलमानें पाण्यांत कालविलेल्या पातळ मातीचे थरावर थर देतात, त्यामुळें नक्षींतील वेल, पाने, फुलें, फळें उठून दिसतात. अखेरीस रोगण चढवून काम घट करतात, व सुखलें ह्मणजे त्याजवर मधून मधून सोन्याचा वर्ख चढवितात. जयपुरास व राजपुतान्यांतील शहापुरासही लाखटलेल्या ढाली होतात. कांचेचे लाखटलले लोटे, हुक्के व कांहीं सुरेख खेळंणी करवली गांवीं होतात. झालवार प्रांतीं बकैन गांवीं खेळणीं, डबे, वगैरे किरकोळ काम होतें. या गांवीं नरोट्यांचे लाखटलेले चुडेही होतात. अलवार संस्थानांत गडावर व राजगड गांवीं लाखटलेलें काम होतें.धोलपुरास तालमीच्या जोड्या व पलंगाचे गाते होतात. वायव्य प्रांतांत बरेली, आग्रा, लखनौ, फत्तेपूर, शहाजहानपूर, बनारस, व मिरजापूर, या गांवीं लाखटलेलें काम होतें. बरेलीस मुख्यत्वें टेबल, खुर्च्या वगैरे विलायती सामान, व आग्रयास डबे, रकाबी वगैरे लहान सामान होतें. लखनौ, फत्तेपूर आणि शहाजहानपूर येथें पलंगाचे गाते होतात; व बनारस आणि मिरजापूर या गांवीं मुलांचीं खेळणीं होतात. फत्तेपुरास लांकडी गंजिफे व डब्याचे गंज होतात.

 बंगाल्यांत हें काम अगदींच थोडें होते. मुरशिदाबाद व पाटणा या दोन गांवीं कोठें जुजबी काम होतें. शिराजगंज या गांवीं लाखटलेलें काम होतें असें ह्मणतात, परंतु त्याचे नमुने बंगाल्यांतील एक्झिबिशन कामदार बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांच्याही अजून पहाण्यांत आले नाहीत.

 मद्रास इलाख्यांत कर्नूळ गांवच्या लाखटलेल्या कामाची पूर्वापार कीर्ति आहे. टेबलें, पेटया, पंखे, वगैरे जिनसा कर्नूळ येथें होतात. विजागापट्टम व कडाप्पा जिल्ह्यांत नोसम गांवींही असलें काम होते. याशिवाय नोसमास चामड्याच्या तुकड्यावर लाखेची नक्षी करून ते साहेब लोकांत विकतात. सांवतवाडीच्या गंजिफाप्रमाणें नोसम येथील गंजिफा प्रसिद्ध आहेत. नोसमगांवीं ताडाच्या कागदाच्या किंवा कापडाच्या पंख्यावरही नक्षी काढतात. नंदियाळ गांवीं साधारण प्रतीचें लांकडाचें काम होतें.वेलोरास कुड्याच्या लांकडाचीं खेळणी करतात. ह्मैसूर प्रांतीं चन्नापट्टण गांवीं खेळणीं,पेटया, इत्यादि लाखटलेलें सामान तयार होतें. याच गांवीं सोंगटया व बुद्धिबळें होतात. तसेंच तिरुप-