पान:देशी हुन्नर.pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०७ ]

कल्याण व पेण या दोन गांवांचे पाळणें, आषाढ व श्रावण पाटीचे खेळ तयार करण्याचे कामीं कोकणपट्टींत पूर्वी मोठी ख्याति असे, परंतु अलीकडे आषाढ व श्रावण पाट्या मोडत चालल्या आणि विलायती मच्छरदाणीचे पाळणे प्रचारांत येऊं लागले त्यामुळें धंदा बसत चालला आहे.

 सांवतवाडीस काताऱ्याचें काम होतेंच; परंतु त्याशिवाय चिताऱ्यांचे काम होतें तसें इतर ठिकाणीं होत नाही. येथें चिताऱ्याचें काम ह्मणजें काय हें सांगितलें पाहिजे. पाट, चौरंग, गंजिफाच्या पेट्या कीं, ज्यांस कमानीनें आंसावर फिरवितां येत नाहीं, असल्या पदार्थावर हातानें रंगीबेरंगी चित्रें काढून त्यांजवर लाखेचा थर द्यावयाचा. हा थर देण्यापूर्वी लांकूड तापवावें लागतें, व त्याजवर पारदर्शक लाख ठेऊन ती वितळूं लागली ह्मणजे सारखी पसरावी लागते. असलें काम पूर्वी पाटावर, पोथीच्या फळ्यांवर, व गंजिफांच्या पेट्यांवर मात्र होत असे; परंतु अलीकडे मेहरबान वेस्ट्राप साहेब यांनीं पुष्कळ मेहनत घेऊन याकामांत सुधारणा केली आहे, त्यामुळें कपाटें, टेबलें, खुर्च्या, दिवालगिऱ्या, नारळाच्या बेल्याचे डबे इत्यादि पुष्कळ पदार्थ तयार होऊं लागले आहेत, आणि त्यांचा साहेबलोकांत खप विशेष असल्यामुळें धंद्यालाही तेज येत चाललें आहे. साहेब बहादूर यांनीं स्वतः सतत मेहेनत घेऊन या धंद्याचा ऊर्जितकाळ केल्यामुळें त्यांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत.

 राजपुतान्यास बुद्धिबळें, सोंगट्या, वगैरे पदार्थ होतात. जयपुरास मात्र काम फार चांगलें होऊं लागलें आहे. तें तेथील चित्रशाळेंतच होत असतें, त्यांत काश्मीर किंवा पंजाब येथील कामाचें अनुकरण करून केलेलें असतें. राजपुतान्यांत शहापुरा गांवीं लाखटलेल्या चितारी कामाच्या ढाली तयार होत असतात. खंडेला गांवीं बडकुलीं होतात. सवाईमाधवपुरास चामड्याचे लाखटलेले गंजिफे होतात. जयपूर व इतर ठिकाणीं रंगीत धुळीच्या पाट्या तयार होतात. कोठा संस्थानांत इंद्रगड गांवीं खिरणीच्या लाकडाच्या सुरया व डबे तयार होतात. लोखंडाच्या सळईवर लाख घेऊन ती वितळवून सुरईवर लावण्याची या गांवीं चाल आहे. बिकानेरास मडक्यांवर, दगडांवर, कांचेवर व हस्तिदंतावरही लांकडाप्रमाणें लाख चढवितात. या बिकानेरी कामाचा वीस चौरस फूट लांबीचा मखरासारखा मोठा एक पडदा विलायतेच्या प्रदर्शनांत सन् १८६९ सालीं गेला होता. त्या-