पान:देशी हुन्नर.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०२ ]

नामशाहींत कमाम व झेल या दोन गांवीं लांकडाचें खोंदीव काम होतें. परंतु त्यांत मुख्यत्वें चित्रें व फळांचे नमुने जास्त असतात. हे नमुने गोकाकास चांगले होतात, व अलीकडे मिरज, भावनगर, बडोदा इत्यादि ठिकाणीं होऊं लागले आहेत.

 सांवतवाडीस, कानडयास व मद्रासेस नारळाचे बेले खोंदून त्यांची नक्षीदार भांडीं करितात.

चंदनावरील खोंदीव काम.

 चंदनावरील कोंरीव काम मुख्यत्वें कानडा, सुरत, मुंबई, बिलीमोरा, त्राव्हनकोर, त्रिचिनापल्ली, हळदगी, रायदुर्ग, तिरुकतुर, मदुरा, उदयगीर, कर्नुल, कोइंबतूर, कृष्णा, गोदावरी, सोराब व सागर याठिकाणीं होतें. चंदनावरील काम फार बारीक व अतिशय सुरेख असतें. सुरत व बिलीमोरा येथील कामाबद्दल माहिती मागें आलीच आहे. पांच दहा वर्षांपूर्वी सुरतेस वेलबुट्टी शिवाय दुसरी कांही नक्षी होत नसे; परंतु अलीकडे कानडा जिल्ह्यांतील लोकांचे अनुकरण करून सुरतेचे कारागीर देवादिकांच्या मूर्तीही खोंदूं लागले आहेत. सुमारें ८० वर्षांपूर्वी सुरतेस चंदनाच्या पेट्या करणारीं ८० कुटुंबें होतीं; परंतु त्यांतील कांहीं मुंबईत येऊन काळबादेवीच्या रस्त्यावर राहिलीं आहेत व कांहींनी आपला धंदा सोडून कारकुनी पत्करिली आहे.

 मद्रास इलाख्यांत त्रावणकोर व दक्षिण कानडा हे दोन प्रांत चंदनाच्या कामाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. साहेबलोकांचें असें ह्मणणें आहे कीं चंदनाच्या लाकडावर खोंदीव काम करण्यास जितकी मेहनत व जितका वेळ लागतो तितकी मेहनत व तितका वेळ खर्च करून न कंटाळतां शांतपणे काम करण्याची शक्ति हिंदुलोकांच्या अंगीं मोठी विलक्षण आहे. चंदनाच्या चंवऱ्या करण्यास तर फारच मेहनत लागते. पुणें प्रदर्शनांत असल्या दोनचार चंवऱ्या आल्या आहेत. पंखे, फण्या, कागद फाडण्याच्या सुऱ्या, व इतर लहान लहान जिनसांस गिऱ्हाइकीं फार असतें. कानड्या प्रमाणें होळकरशाहींत रामपूर गांवींही चंदनाच्या चौऱ्या होतात.

लांकडावरील कोंदण काम.

 लांकडावर खोंदीव काम करून म्हणजे कोंदणासारखीं घरें पाडून त्यांत