पान:देशी हुन्नर.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १०१ ]

व्यांचे उपाध्याय हिंगणे यांच्या अतिसुंदर वाडयांतील एका खिडकी सारखी खिडकी खोंदून घेतली तीस ११७ रुपये लागले. या मानानें या अफाट वाड्याची किंमत काय झाली असेल त्याचें अनुमान वाचकानींच करावें. नाशीक शहरीं कोणत्याही जुन्या घराकडे पाहिलें तरी त्याची बहाले, दरवाजे, खिडक्या व छतपट्या याजवरील नक्षी नेहमीं कमळाच्या आकाराची आहे असें दिसून येतें. नाशिकाचे प्राचीन नांव पद्मावती आहे, व हें नांव ठेवण्याचें कारण असें सांगतात कीं हें शहर बसलें आहे त्या ठिकाणीं गोदावरीस सहा नद्या मिळून त्याजमुळें त्या जागेस कमळाचा आकार आला आहे. कमळाचीच नक्षी जुन्या घरांवर जिकडे तिकडे खोदण्याचें कारण 'पद्मावती' हें नांव असावें असें दिसतें. पद्मावती शहरीं वाडे बांधावयाचे तेव्हां त्यांजवर पद्माची ह्मणजे कमळांची नक्षी काढावी अशी बुद्धि होणें साहजिक आहे. टामस मारिस या साहेबानें सन १८०१ सालीं प्रसिद्ध केलेल्या आपल्या " इन्डियन अन्टिक्विटी" नांवाच्या पुस्तकांत हिंदुस्थानांतील कमळांपासून ग्रीस देशांतील कॉरिन्थियन या नांवाच्या खांबाची उत्पादकत्ति आहे असें कबूल केले आहे. कॉरिन्थियन खांब मुंबईच्या टाऊन हालास आहेत. त्यांजकडे पाहिले ह्मणजे खांब हा कमळाचा देंठ व त्याच्या वर खाली असलेला गलथा हा कमळाच्या पांकळ्या तोडून टाकिल्यावर आंत राहिलेला मधला भाग आहे असें लक्षांत येईल. या मधल्या भागास चार बाजूला चारच कमळाच्या पाकळ्या शिल्लक ठेवून बाकीच्या तोडून टाकिल्या, व त्या चार पाकळ्या सारख्या लावून त्याचीं टोकें जरा मुरडली, ह्मणजे जो आकार होईल तो कारिन्थियंन खांबाचा मूळ " श्री ग" आहे. मग त्याजवर कमळाच्या पाकळ्या बदला आक्यांन्थस नांवाच्या पानांची योजनाकरून ग्रीक लोकांनी त्या आकारांत फेरफार केला आहे.

 आमच्या घरांत टेबल, खुर्च्या, कपाटें, दिवालगिरी इत्यादि पदार्थ इंग्रजांच्या सहवासामुळेच येत चालले आहेत. मुंबईत मेहेरबान वुइंब्रिज साहेब, अमदाबादेस फारेस्टसाहेब, रत्नागिरीतील स्कूलआफइंडस्ट्रींतील मुख्य अधिकारी, या तिघांनी उत्तम प्रकारचें 'फरनिचर' करण्याचे कारखाने काढले आहेत.व त्यांचे अनुकरण करून मुंबईतील शेट जमशेटजी नसरवानजी कॉबिनेट मेकर इत्यादिव्यापाऱ्यांनीं मोठाले कारखाने काढल्यामुळें मुंबईतील जुन्या प्रकारच्या खोंदीव कामास पूर्वी सारखी तेजी राहिली नाही. वायव्य प्रांतांत नगीना गावीं लांकडाची खोंदीव टेबलें, पेट्या, मकलदानें, वगैरे जिनसा पुष्कळ होतात. नि-