पान:देशी हुन्नर.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९५ ]

हत्यारें सुरेख आहेत. कच्छभूज, लिमडी, बडोदें, तळेगांव, संगमनेर, सिन्नर, तळोजें, बुलढाणा येथील आडकित्ते प्रसिद्ध आहेत.

 गोविंदराव आठवले यानीं पुण्यांत चाकू, सुऱ्या, व वस्तारे, यांजवर पाणी देण्याचा कारखाना काढिला आहे.

 पंजाब इलाख्यांत करनाळें गांवीं आडकित्ते यतार होतात. त्यांस पितळी दांडे असतात. त्यांत आरशा बसवितात. याच गांवीं तशाच कांच बसविलेल्या कात्र्या तयार होतात. पुष्कळ पातीचे चाकू करून त्यांत कात्री, बूच काढण्याचा स्क्रू, हूक, करवत, कानस, इत्यादि बरीच हत्यारें असतात. हे चाकू गुजराणवाला जिल्ह्यांत निजामाबाद येथें होतात.

 बेहेरा गांवींही चाकू, कात्री, सुऱ्या वगेरे जिनसा होतात. त्यांस मुठी दगडाच्या बसविलेल्या असतात. कधीं कधीं विलायतेहून आलेल्या मोडक्या कानशी घेऊन त्याचीं हत्यारें या गांवीं करितात. इमामउद्दीन, महंमदद्दीन, खुदाबक्ष, आणि अल्लाजोवायाँ असे तीन शिकलगार बेहेरा या गांवीं प्रसिद्ध आहेत,

 गुजराथ गांवीं कांहीं लोहार लोक चाकू, आडकित्ते, व कात्र्या, तयार करून तेथील कुफ्तगार लोकांस विकतात.

 राजपुतान्यांत जयपूर, बिकानेर, झालवार व जोधपूर या प्रांतीं चाकू, कात्र्या, आडाकित्ते वगैरे होतात. जोधपूरच्या राज्यांतील नगर गांवीं पिंचा या नांवाचें एक हत्यार तयार होतें. त्यांत चाकू, कात्र्या, व बूचकाढण्याचा स्क्रू, असे तीन जिन्नस असतात.

 मध्यहिंदुस्थानांत रतलाम येथें चाकू होतात. व छत्रपूर येथें आडकित्ते होतात. नागपूर येथील एका प्रसिद्ध शिकलगारानें आपला हत्यारें करण्याचा धंदा सोडून चाकू कात्र्या करण्याचा धंदा सुरू केला आहे, कारण त्यांत त्याला विशेष फायदा होतो. या मनुष्याचें काम नागपूरच्या आसपास बरेंच नावाजलें आहे. दाबोआ जिल्ह्यांत जोब्रा गांवींही चाकू कात्र्या तयार होतात.
 वायव्यप्रांतांत मिरत, शहाजहानपूर, व ललितपूर,या तीन गांवीं होत असलेले चाकू, कात्री, वगैरे सामान विलायती सामानासारखें तयार होतें.

 बंगाल्यांत बरद्वान प्रांतांतील बनपास गांवची पूर्वी चाकू, कात्री, आडकित्ते, वगैरे करण्याची फार ख्याती असे. हल्लींही तेथें असलें काम करणाऱ्याची ६०० कु-