पान:देशी हुन्नर.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ४ ]

 मुसलमान चित्रकारांनी काढलेल्या इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या तसबिरी हल्ली कोठे कोठे विकत मिळतात. मुंबईतील चित्रशाळेत अशी दहा चित्रे आहेत. त्यांत फिरोकशीयर बादशाहा, दुसरा शहाआलम बादशाहा, व मोहोबतखान जहांगिर यांच्या तसबिरी आहेत. या मुसलमानी राज्यांतील चित्रकारांचे वंशज हल्ली दिल्लीत आहेत. "दिल्ली पेन्टींग्ज" या नांवाने इंग्रजलोकांत प्रसिद्ध असलेल्या हस्तीदंतावरील तसबिरी हेच लोक काढतात. त्यांच्यांत झुलफिकिरखान या नांवाचा एक मनुष्य विशेष प्रसिद्ध आहे.

 अजंटा येथील लेण्यांतील चित्रेंं तयार झाल्यापासून व मुसलमानी सत्ताधीशांनी चित्ररेखनविद्या कांहीअंशी ऊर्जितदशेस आणल्यापासून पुढेंं तिचा ऱ्हासच होत चालला होता. परंतु गेल्या वीस बावीस वर्षांत इंग्रजसरकारानी ठिकठिकाणी चित्रशाळा स्थापन केल्या आहेत, त्यामुळे आतां पुनरुज्जीवन होईल अशी आशा आहे. तथापि अशा शाळांतून जाणारे बहुतेकविद्यार्थी होतकरूच असतात असेंं नाही. याचे कारण असेंं आहे की जी मुले इतर कोणत्याही शाळेत शिकून तयार होण्यासारखी नाहीत तीच अशा शाळांतून पाठविण्याची चाल आहे. ही चाल बंद पडून हुशार मुले किंवा ज्या मुलांस चित्ररेखनाची स्वाभाविक आवड आहे ती मुले ज्यावेळी या चित्रशाळांतून अभ्यास करू लागतील, त्यावेळी या विद्येच्या भरभराटीस सुरुवात होईल. चित्रशाळेत मुलगा जाऊ लागला ह्मणजे त्याने आपल्या इतर अभ्यासावर पाणी ओतलें पाहिजे असे नाही. विलायतेंत कालेजांतील काही मुलें चित्ररेखनविद्या शोकाखातर शिकत असतात. उदाहरणार्थ इंडियाआफिसांत हल्ली कौन्सिलर, काम करीत असणारे व आपले पुण्यांतील प्रसिद्ध डायरेक्टर आफ पब्लिक इन्स्ट्रकशन सर जेम्स पील, आपले माजी गव्हरनर सर रिचर्ड टेंम्पल, माजी आक्टिग डायरेक्टर आफ पब्लिक इन्स्ट्रकशन जनरल वाडिंग्टन, व माजी डायरेक्टर आफ इन्डियन रेलवेज कर्नल हाँनकाँक हे होत.

भिंतींवरील चित्रें.

 प्रस्तुतकालींं भिंतींंवर चित्रे काढण्याची पुणेंं, विजापूर, दिल्ली, अजमीर व इतर मोठमोठ्या शहरींं चाल आहे. परंतु वेलबुट्टी खेरीज करून त्यांतील बाकीचेंं काम अगदीच ओबडधोबड असते. वाघ, हत्ती, शिपाई प्यादे, वगैरे काडलेले असतात खरे, तत्रापि त्यांचे हात कोठे, पाय कोठे, चेहेरा कोणीकडे याचा