पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आश्चर्य वाटायचं... हे कसं जगावेगळं? मला माहीत नाही. पण ते सत्य होतं... वास्तव होतं... मी 'माणूस' होते.
 हा एकटेपणा मी माझ्या एका कलीगना, सहका-यांना एकदा असह्य होऊन शेअर केला... तेव्हा आम्ही सेमिनारच्या निमित्ताने प्रवासात होतो... पुढे दोन दिवस एकाच हॉस्टेलवर राहायला होतो... दिल्लीतले ते दोन दिवस... त्यानं माझं जीवन बदलून टाकलं... मला जगावं अशी उमेद त्यांनी दिली.
 मी घरी परतले... डॉक्टर, सायकॅट्रिस्टना भेटले... लोक, सासरचे सर्वच म्हणू लागले... मॅडम, तुमची कमाल आहे... तुम्ही साहेबांना मरणाच्या दारातून स्वतःच्या पायावर उभं केलं... विश्वास नाही बसत... वेडा शहाणा होऊ शकतो. त्याचंही रहस्य होतं... माझ्या मित्राच्या सहकार्याने, मार्गदर्शनानं मी हा प्रवास आखला... डॉक्टरांना विश्वासात घेतलं... हे सारं करण्याचंही कारण होते... सासू, सासरे गेले तसे नणंदा, दीरांनी सोसायटीला अर्ज दिला... फ्लॅट त्यांच्या नावावर करावा... मी वकील मित्रांशी बोलले... त्यांनी मोठी मदत केली; नाहीतर मी रस्त्यावरच आले असते त्यांचीही मदत झाली. त्यांनी कागदावर सह्या करायचं नाकारलं. विशेष म्हणजे मी नसताना. दीरांना म्हटले कसे, ‘ती कशीही असू दे... मला बघते... तुम्ही नाही' हे शहाणपणही त्यांना त्या माणसांच्याच व्यवहारातून आलं असावं... मी काही शिकवलं, पढवलं नव्हतं... तुम्ही विश्वास ठेवा, ठेवू नका.
 याच शहाणपणाच्या आधारावर मी एकदा त्यांना विश्वासात येऊन कृत्रिम गर्भधारणेबद्दल समजावलं... ते चकित... मग अगोदरच का नाही केलं आपण? मग मी त्यांना आईचा विरोध सांगितला तसे ते संमती देत दवाखान्यात आले.
 दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर ज्योतीचा जन्म झाला! माझे ते मित्र सहकारी मदतीला आले, त्यांची पत्नी पण... कुणा स्त्रीला हे पटणार नाही... पण अपवाद असतोच ना? आणि अपवादानेच नाही का नियम सिद्ध होत? मित्रांनी नि त्यांच्या बायकोनं सर्व ठिकाणी हात दिला म्हणून मी सनाथ झाले...

 या साऱ्या घटना मी सरळ सांगत सुटले तितक्या त्या कधीच सरळ घडत गेल्या नाहीत... प्रत्येक सरळ वाटणाच्या रस्त्यावर थांबा, वळण, चढ, उतार, स्पीड ब्रेकर यायचेच... कधी कधी पॉवर ब्रेक, शॉक्स ही

दुःखहरण/७८