पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इच्छामरण मी स्वीकारते आहे...


 तुम्ही सगळे जगत होता तेव्हा मी रोज एक नवं मरण भोगत होते. तो मरणभोग जगताना वाटायचं की, आत्महत्या करावी; पण पदरी ज्योती होती. तिचा निरागस चेहरा समोर यायचा नि मग वाटायचं, नाही... जगलंच पाहिजे... माझी आई मला आश्रमात टाकून परागंदा झाली म्हणून मला या नरकयातना भोगाव्या लागतात... माझा काही दोष नसताना... ज्योतीला मरणजिणं वाट्याला येऊ नये म्हणून तरी जगायलाच हवं...
 परवा अरुणा शानबागचा निकाल वाचला... चुकीचाच वाटला. इच्छामरण हवंच... त्यासाठी माझ्यासारखं मरण भोगावं लागतं... मी न्यायाधीश असते, तर नक्कीच अरुणाला मरण दिलं असतं नि पिंकीला दिलासा...

 मी अनाथाश्रमात जन्मले, वाढले, शिकले. आश्रमातल्या इतर मुलींपेक्षा मला तसं सुसह्य बालपण मिळालं होतं म्हणायचं... कारण मला सिस्टर सांभाळायच्या... इतर मुली मॅट्रिक होणं मारामार; मी एम. ए., एम. एड., पीएच.डी. या शिक्षणाच्या ध्यासात माझे लग्नाचे वय केव्हा उलटून गेलं समजलंसुद्धा नाही... सिस्टरांना वाटायचं, मला फॉरेनचा नवरा मिळावा... मलाही त्या स्वप्नानं आत सुखावल्यागत व्हायचं... स्थळही आलं... फोनाफोनी... पासपोर्ट, व्हिसा सर्व झालं... विमानाचं तिकीटच ते काय काढायचं बाकी होतं नि मैत्रिणीचा फोन आला, अगं त्या मेननांचं लग्न झालंय... मुलगा आहे... डायव्होर्सी आहे, भरपूर पितो म्हणून तर पिल्ले

दुःखहरण/७४