पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही तरी करत दिवस ढकलत होते; पण एका नव्याच संकटाने मजकडे आलेत.
 त्यांची दोन मुलं आहेत. पैकी एक वयात यायला लागला आहे. दुसरा पण उंबरठ्यावर आहे. मोठा मुलगा वसंत वयात यायला लागलेला... त्याची वाढ मुलीसारखी व्हायला लागलीय... छाती भरायला लागली आहे. लहानपणापासून मुलींतच असायचा; पण आता मोठा व्हायला लागला तसा चेष्टेचा विषय होऊन बसलाय... घरी कोंडून घेऊन राहतो... तसं आईनं धुणी-भांडी करायला ज्या डॉक्टरांकडे जायची त्यांच्याकडे हा विषय काढला... त्यांनी त्याची तपासणी केली आणि चिठ्ठी घेऊन माझ्याकडे पाठवलं.
 काही मुला-मुलींबाबत अशा बदलाचे प्रसंग येतात... ओढवतात. लहानपणापासून मुलगा म्हणून वाढलेला, वाढत्या वयात मुलगीसारखा वाढू दिसू लागतो... याउलट लहानपणी मुलगी म्हणून वाढलेली... कळत्या वयात मुलगा दिसू लागते... वसंतात मुलीची लक्षणं दिसू लागलीत... तिचा छोटा भाऊ किरणची पण तपासणी केली... त्याचंही असंच होणार असं दिसतंय! ब-याचदा जे सुशिक्षित असतात त्यांच्या मुला-मुलींचे प्रश्न निर्माण होणाच्या काळातच सुटतात... अज्ञान व गरिबीमुळे मात्र या कुटुंबाची वाताहत झाली आहे खरी! आधी अपघात... मग ओढाताण... बेकारी... रोज जगणं म्हणजे युद्धाचा प्रसंग... आत्ता कुठे दोन घास सुखानं पोटात जाऊ लागले तोवर वसंताचा गोळा पोटात उभा... किरणदेखील हेच वादळ घेऊन येणार... सारं कुटुंब नुसतं कसं हादरून गेलंय... ज्वालामुखीवर बसलंय असं वाटतं.
 आम्हाला तुमची एक मदत हवी आहे. आम्ही या दोन मुलांना मुली म्हणून तुमच्या संस्थेत दाखल करू इच्छितोय... मुलींच्या संस्थेत राहिल्या तर त्या मुली होऊन जातील... त्यांचं योग्य वेळी ऑपरेशन करता येईल... लिंग बदलाचं ऑपरेशन. हा प्रश्न सुटायला तुमची मदत हवी आहे. त्यांचं नाव, पोषाख, वागणं बदललं की ऑपरेशन एक औपचारिकता आहे."

 मला हा प्रश्न नवा होता. आमच्या संस्थेच्या जीवनातलाही हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा... मी असा प्रश्न ऐकूनही नव्हतो. इतक्या वर्षांत मला मदर टेरेसांचं वाक्य आठवलं, “वर्क अॅकॉर्डिंगली' प्रसंग पाहन कार्य करा! त्यांना मदत तर करायलाच हवी होती. मी हिय्या केला, पण हे काम सोपं नव्हतं. रिस्कही होती, मुलींच्या संस्थेत मुलं ठेवायची. मी नि

दुःखहरण/५0