पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


डॉक्टर पण... मात्र औषधं बँडचीच... पोलीस, जेलर चांगली माणसं... आम्ही त्यांना 'बाबा' म्हणतो... यातच सर्व आलं!
 माझ्या तारखा लागायच्या... प्राण कंठाशी यायचा... जीव टांगणीला लागायचा... कुणाला देव भेटला की नाही माहीत नाही... तुकारामाला विठ्ठल भेटला होता म्हणे (मला पण... पण दुसरा!)... मृत्यू मात्र मला भेटला... भेटत राहिला... तारखेच्या दिवशी मृत्यू दिसायचा... भेटायचा... कसा ते नाही सांगता येणार... जावे त्याच्या वंशा... तहान लागायची... घाम यायचा... फाशीचा दोर दिसायचा... वधस्तंभाकडे आपण निघालो आहोत असं वाटत राहायचं... लवकर लवकर सगळं आवरून बसायचो... पोलीस गाडीची वर्दी केव्हा येईल याची वाट पाहात राहायचो... इतर बंदीपण बरोबर असायचे... दुस-या बरॅकमधले पण... त्यानिमित्त परत माणसात यायचो... रस्ते, माणसं, मोटारी... दुकानं, हॉटेल्स... अधाशासारखा पहायचो... कधी सरकारी वकील नसायचे... कधी साक्षीदार... कधी बंदोबस्त नाही म्हणून तारीख चुकायची... हे सारं जीवघेणं असायचं? केव्हा एकदा निकाल लागेल असं वाटायचं!
 वाटायचं बक-या, कोंबड्यासारखे एक घाव दोन तुकडे व्हावे... इंतजार का फल मीठा होता है, हे खोटं आहे... खट्टा होता है हेच खरं!
 अजून निकाल लागायचा होता... तारखा वाढतील तसा मी भेदरत होतो... एक दिवस फणफणलो... दोन दिवस तुरुंगातल्या दवाखान्यात अॅडमिट होतो... डॉक्टर चांगले होते... वॉर्डबॉय बंदीच होते. भाऊच होते... पण इथं भावकी नव्हती, भाऊबंदकी नव्हती. भेद, स्वार्थ नव्हता... सर्व समदुःखी, पण काही क्षण समसुखी होतो... मग ताप उतरेना म्हणून मला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं... तिथले डॉक्टर्स, नर्स, आया, वॉर्डबॉय... इतर पेशंटशी माणूस म्हणून असतील, बरे वागायचे. पण आमच्याशी... बंदी बांधवांशी वैर होतं त्यांचं... सारी उपकाराची भाषा... तुच्छ व्यवहार... खून केल्याचा पश्चात्ताप पोलीस, डॉक्टरांच्या सान्निध्यात अधिक वाटायचा... कुपणानंच शेत खाल्ल्यावर कुणाकडे दया। भाकायची... जेव्हा धीर हवा असायचा... ही माणसं मोठी धीट व्हायची... वाटायचं, त्यांनी नीट वागावं...

 मी मधे मधे रजेवर गेलो आहे... पॅरोलवर.. चांगलं वागलो... मुदतीत परत आलो... जेलची शिफारस भेटली... सद्वर्तणुकीची... चांगली वर्तणूक ठेवूनही पोलीस रिपोर्ट केव्हाच चांगला आला नाही... माझाच

दुःखहरण/४७