पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विसरता येते... व्रण मात्र पुसता येत नाहीत... नि ते व्रण निवांत झोपही लागू देत नाहीत... माणसानं आत-बाहेर एक असावं.
 मी रियाजला त्या दिवशी काही बोललो नाही. इतकंच म्हणालो, “तू इतका मोठा झाला आहेस की, मी तुला भरवावं, शिकवावं असं वाटत नाही. जो तो आपली दृष्टी, संस्कारांना जगतो... मी, संस्था कमी पडलो, याचं वाईट वाटतं.'
 मी माझ्या कामात रियाजला विसरून गेलो... अशा अनेक अनुभवांमुळे मी माझं मन फकिरासारखं करून टाकलं होतं... 'नेकी कर और समुंदर में डाल'. वर्षा-दोन वर्षांनी मला कुणाकडून तरी कळलं की, त्यानं अमेरिकेत जायच्या आमिषानं एका मुलीशी प्रेमविवाह केला... ती श्रीमंत होती... तिला याचा पूर्वेतिहास नंतर कळला... तिनं याला त्याची जागा दाखविली... त्या दिवसांपासून तो कुणालाही दिसला नाही. मी मात्र त्याला शोधतो आहे... मला असं वाटतं... आता त्याला माझी अधिक गरज आहे... अन् मला मदतीचा हात द्यायचा पण आहे... पक्षी परतून येणार याची मला खात्री आहे. ‘सुबह का भूला, देर सही, शाम को लौटता ही है।' याची मला एव्हाना खात्री होऊन गेली आहे.

◼◼

दुःखहरण/३७