पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रियाज आल्यापासून अबोल होता. चेह-यावर फारसे भाव नसायचे. त्यानं दंगा केल्याचं कधी आठवत नाही. दहावी पास झाला. शाळेत पहिला आला. ७५ टक्के गुण होते. विचारलं, “पुढे काय करणार? कॉलेजला जायचं होतं त्याला. त्याची संस्थेतली मुदत संपली होती. संस्थेपुढेही प्रश्न होता... मग आम्ही त्याच्यासाठी ‘किशोर अनुरक्षण गृह सुरू केले. बारावी होऊन तो सायन्सला गेला. त्याला कॉम्प्युटर सायन्सला जायचं होतं... माक्र्स कमी होते... प्रवेश मिळत नव्हता. प्राचार्यांना जाऊन भेटलो. खास बाब म्हणून प्रवेश मिळाला; पण देणगी द्यावीच लागली... देणगीवर आमची संस्था चालायची... या निमित्ताने संस्था देणगीदार झाली. ती एका उदारमनाच्या उद्योगपतीमुळे!
 रियाजमुळे संस्थेच्या मुलांचं कॉलेजला जाणं सुरू झालं. नंतर मुलीही कॉलेजला जाऊ लागल्या. तशी संस्था घर बनून गेली. पाहता पाहता रियाज बी. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) झाला. नंतर त्याच्याच प्रयत्नानं एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटरमध्ये तो ट्यूटर झाला. स्वावलंबी झाला. इतर मित्रांबरोबर खोली घेऊन राहू लागला. ढालेकाकांनी त्याच्या मागे इंजिनिअर होण्याचा घोषा सुरूच ठेवला होता; पण त्याला यातच करिअर करायची होती.
 दोन-तीन वर्षांनी अचानक एक दिवस एक मासिक घेऊन आला. ‘कॉम्प्युटर एज्युकेशन', सांगू लागला, ‘दादा, मराठीतलं हे पहिलं, कॉम्प्युटर मॅगेझीन'. मी चाळलं अन् धक्काच बसला. संपादक म्हणून नाव होतं ‘रमेश जाधव' हे कोण विचारताना सांगितलं की, जाईल तिकडे लोक विचारतात... कॉलेजातही विचारायचे ‘रियाज खुमान ढाले' असलं कसलं धेडगुजरी नाव रे?' मी नाव बदलून घेतलंय... गॅझेट केलंय... मुली बघताना पण त्रास व्हायला लागला दादा..." मी निरुत्तर होतो. समाजात माणूस महत्त्वाचा नसतो. त्याची जात, धर्म, नाव... माणूस म्हणून तुम्ही काय असता ते गौण होत जातं... ते या देशाला कुठे नेणार कोणास ठाऊक?

 या घटनेला काही दिवस झाले असतील अन् आमचे काळजीवाहक जोडपे कांबळे मामा नि मामी रडत आल्या... सांगू लागल्या... रियाज कॉलेज करत असताना आम्ही त्याला मागेल तो पैसा, अडका, कपडे, पुस्तकं देत राहिलो... आम्हाला आशा होती... तो आपला दत्तक मुलगा व्हावा...' होय म्हणत राहायचा. गेले काही दिवस तो संस्थेतल्या बेबी

दुःखहरण/३५