पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


महेशनं काखा वर केल्या... तशी तिची जमीनच हादरली... सुनंदा अल्पशिक्षित होती; पण शहाणी होती... तिनं एका डॉक्टरबाईशी संधान बांधलं... त्यांनी पुरवलेल्या माहितीवरून ती स्वतःहून आमच्या संस्थेत दाखल झाली... दिलेल्या जबाबात तिनं झाला प्रसंग सांगितला होता... आई-वडील, चुलते ठार मारतील याचं भय... शिवाय महेशच्या घरातले विश्वामित्र होण्याचा धक्का मोठा होता... काय करावं सुचत नव्हतं... संस्थेत ती अबोल असायची, एकटी राहायची, भूक नसायची, सारखी पडून राहायची... झोप उडालेली तिची स्थिती चुकलेल्या हरणीपेक्षा वेगळी नव्हती...
 आम्ही तपास करून पालकांना बोलावून घेतलं... नंतर महेशच्या पालकांनाही; पण ते ऐकायच्या स्थितीत नव्हते... त्यांना हे घोंगडं गळ्यात नको होतं, ते गावातील प्रतिष्ठेमुळे. मुलीचे वडील तयार झाले. मामाच्या गावी सुनंदाला ठेवायचं ठरलं. महेश गुपचुप संधान साधून होता. त्यामुळे मामानं सक्ती करूनही सुनंदा पोट पाडायला तयार नव्हती... मला नोकरी लागू दे... मी तुला करून घेतो म्हणून निरोप पाठवत राहायचा... त्या आशेवर सुनंदा आकाश पेलून उभी होती. या ताणतणावात नऊ महिने केव्हा उलटले समजलंसुद्धा नाही.

 सुनंदाला मुलगा झाला तसं बापानं पाणी सोडलं... गुरुजींना अब्रू चव्हाट्यावर येऊ नये असं वाटत राहायचं... ते स्वाभाविक होतं... दोनचार दिवस विचार करून त्यांनी पोरीला मोकळं करायचं ठरवलं... सुनंदा पोराचा बळी द्यायला तयार होईना. तसं मग मूल सोडायचं ठरलं... रात्रीच्या वेळी मूल घाटात ठेवायचं... आडाला राहून ते कुणी घेऊन जाईपर्यंत पहारा ठेवायचा ठरलं... मूल पाहून उगीच बालंट नको म्हणून एक... दोन गाड्या निघून गेल्या... अन् गस्तीवरच्या परतणाच्या पोलीस गाडीची नजर बाळावर पडली... घाट उतरताना तर बाळ नव्हतं... “अर्ध्या तासात कुठून आलं म्हणून त्यांनी वायरलेस वरून दोन्ही बाजूच्या चेक पोस्टवर नाकाबंदी केली... चार तास उलटून गेले तरी तपास लागेना... तसं त्यांनी बाळ उचललं नि चेकपोस्टवर आणलं... पहारा, तपास चालू ठेवला... महिला पोलिसांची कुमक मागविली. पहाट होता होता घाट चढून पायी येताना दोघं-तिघं दिसली म्हणून पोलिसांनी हटकलं. पहिल्यांदा त्यांनी आपण या गावचेच नाही, असा बहाणा केला; पण तो भाषेवरून फार वेळ टिकला नाही... कोकणच्या पोलिसांना ही मंडळी घाटावरची

दुःखहरण/३०