अमृत देशमुख हे एक जिद्दी आणि चिवट असे प्रतिकूल परिस्थितिशी झगडणारे मन आहे. या प्रकारच्या मनात प्राप्त परिस्थिती विषयी उपहास आणि वैताग आढळणारच. अनेक कवितांमधून हा उपहासाचा स्वर आपल्याला दिसतो. तरुणाच्या जीवनात प्रेम आणि लग्न हा एक महत्त्वाचा भाग असता. पण हा नशा विवाहानंतर फार लवकर संपून जाते. प्रेमपत्रापेक्षा संसार चालविण्यासाठी पैशाची नोट ही जास्त महत्त्वाची वाटू लागते. लग्नापूर्वी प्रेमपत्र हा एक महत्वाचा ठेवा असतो. ती जपून ठेवण्याजोगी बाब वाटते. लग्नानंतर हे प्रेमपत्राचे गर्छ सरकारी प्राईझ बाँड असते तर किती बरे झाले असते, पैसा तरी मिळाला असता असे वाटू लागते. विवाहातील फोटोपेक्षा धान्याचे रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते. पत्नीला डोहाळे लागण्याऐवजी आपल्याला लॉटरी लागली असती तर किती बरे झाले असते हा विचार मनात येतो. स्वप्नांच्या जगातून आपण बाहेर येतो. रखरखीत आणि भगभगीत व्यवहारवाद बलवान होऊ लागतो. या पातळीवर प्रेम हा देव नसून पैसा हा असतो. भविष्य पाहणे हाही एक असाच मनाचा भाबडा खेळ. उद्या काय होणार इतकीच माणसाला जिज्ञासा नसते. नाही तर उद्या फारसे काही होणार नाही, मागचे गाडे तसेच चालणार हे काही समजायला कठीण नसते. खरी आशा उद्या विषयी असते ती ही की उद्या चांगला स्वप्नपूर्तीचा येईल. या स्वप्नपूर्तीच्या उद्याची आतुर मनाने आपण वाट पाहत असतो. सगळे भविष्य कथन या सूत्रानेच चालते. भविष्य सांगणारे लोक असे सारखे दुहेरी बोलत असतात की त्यांचे म्हणणे पूर्णपणे कधी खोटे ठरत नसते. माझ्या लहानपणी नंदी बैलाची गंमत मी पाहिली आहे. हा बैल “पाऊस पडेल का?" या प्रश्नाचे उत्तर हो म्हणून देई व “पाणी पडेल का?' याचे उत्तर नाही म्हणून देई. देशमुखांच्या कवितेतील ज्योतिषी असाच आहे. पोटाची आबाळ आहे व ती चालू राहणार हे सांगतानाच भाग्यरेषा बळकट आहे म्हणून तो सांगतो. भविष्य सांगणाराला गि-हाईकाच्या मनावर कुंकर ही घालता आलीच पाहिजे. अगदीच खोटे विश्वसनीय वाटत नाही व पूर्ण खरे आकर्षक नसते. मग तापट असलात तरी हळूवार आहात हे सांगणेच भाग आहे. खोट्या आशेवर झलण्यास उत्सक असणारे मन आणि असे झुलविणेच चरितार्थाचा उद्योग असणारा व्यवसाय हे सारे कवीसाठी हसण्याचा विषय झाले आहे. वडिलांचे फार लाडके होता पण पितसख थोडे होते. तशी आईची माया नाही पण आई आहे असा चिमटा या खट्याळपणाचाच भाग आहे. वळणाच्या वाटा जर सोडल्या तर मात्र रस्ता धोपट आहे हा यथाशक्ती पातिव्रत्य पाळण्याचाच प्रकार म्हटला पाहिजे.
पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/61
Appearance