पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- . - . I P - . . . ... मिळतेजुळते आहे. शुद्ध परिहासाला महत्त्व देणारी कविता मराठीत फार तुरळक आहे. त्यात हा कविता संग्रह आपली जागा घेईल. आपण हास्य का निर्माण होते याची चर्चा फार करतो. हास्य नामताचा कारणे शोधण्याचा प्रयत्न फार करतो. हा प्रयत्न फारसा यशस्वी होण्याचा संभव नाही हे मात्र आपल्याला लौकर कळत नाही. औचित्य, विसंगती, अपेक्षाभंग आणि अतिशयोक्ती ही हास्याची कारणे म्हणून मीमांसकाना वारवार नादावलला आहेत. एका मर्यादेत ही कारणे खरी आहेत. या मर्यादेबाहेर हास्याच्या उगमाची ही सर्व कारणे खोटी आहेत. आपण म्हणतो यादव छप्पन कोटी होते. ही अतिशयोक्तीच आहे. कारण यादव छपन्न कोटी असू शकत नाहीत. पुरुष आणि स्त्रिया मिळून ११२ कोटी लोकसंख्या असणारे एक नगर गृहीत धरल्याशिवाय यादवांची संख्या ५६ कोटी मानता येत नाही. आजही एवढे मोठे शहर अस्तित्वात आणता येत नाही. तेव्हा ही अतिशयोक्ती आहे हे उघड आहे. पण यादव छप्पन्न कोटी होते हा विनोद नाही. ती गंभीर श्रद्धा आहे. सोन्याची लंका, सोन्याची द्वारका या कल्पनाही अतिशयोक्तीच आहेत. पण त्या विनोदी नाहीत. अतिशयोक्ती असली म्हणजे विनोद होतोच, ती हास्यजनक असतेच हे म्हणणे चुकीचे आहे. विद्यार्थी परीक्षेला बसतात, अपेक्षा पास होण्याचीच असते. पण नापास होतात. नोकरीसाठी चाचण्यांना जातात आणि नोकरी मिळत नाही. एखाद्या मुलीवर प्रेम करतात आणि ती नकार देते. ही सगळी अपेक्षाभंगाचीच उदाहरणे आहेत. सध्या निवडणुका चालू आहेत. अनेक भरवशाचे गडी या निवडणुकीत बाद होतील, हा अपेक्षाभंगच आहे. पण म्हणून पडलेले उमेदवार पोट धरून हसतील असे समजण्याचे कारण नाही. सरळ रस्त्याने चालणारा माणूस केळीच्या सालीवरून पाय घसरून पडतो व लोक हसतात हे खरे आहे. एक गुंड रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या पाठीत. सुरा खुपसतो. रस्त्याने.. जाणारा माणूस अचानक मोटारखाली येऊन त्याचा चुराडा उडतो. त्याठिकाणी औचित्यविसंगती असली तरी हास्य निर्माण होत नाही. जिथे विनोद असतो त्याठिकाणी आपण अपेक्षाभंग, औचित्यविसंगती व अतिशयोक्ती दाखवू शकतो पण जिथे या तीन बाबी असतात तिथे हास्य असतेच असे आपण दाखवू शकत नाही. अपेक्षाभंग आहे पण हास्य नाही हे ठिकाण पाहिले की प्रश्न निर्माण होतो - जिथे अपेक्षाभंग आहे व हास्य आहे त्याठिकाणी तरी अपेक्षाभंग विनोदाचे कारण कसे असणार? मग हास्याचे जनक कारण कोणते? HTY चौथे अपत्य | ४७