पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नटलेल्या त्यांच्या शैलीत सूक्ष्म माधुर्य आहे. हे माधुर्य पहिल्याच वाचनात चटकन जाणवेल या जातीचे नाही. अतिशय चांगल्या कवितेतही एक जात आपल्या वेगळेपणामुळे ठळक उठून दिसणारी व स्वत:कडे लक्ष वेधून घेणारी अशी असते. या जातीची कविता लताबाईंची नाही. पण जी वाचता वाचता सौम्यपणे गोडी जाणवत राहते, हळूहळू त्या शैलीचे माधुर्य मन जिंक्रीन जाते अशा झिरपणाऱ्या, पाझरणाऱ्या व व्यापणाऱ्या जातीची त्यांची कविता आहे. 'शिरोभूषण व्हायची। नाही देवा आस मला' अशा सपाटीवरून ही कविता सुरुवात होते त्यावेळी तिचे सामर्थ्य चटकन जाणवत नाही. पण 'वेड्या माझ्या प्रीतिफुला। ध्यास परि रात्रंदिन। पंच प्राणांनी पूजावे। तुझे चरण पावन' या ओळीजवळ आल्यावर याही कवितेत काही अस्सलपणा आहे असे जाणवू लागते. 'वृक्ष वल्लरींनी कधी। आजवर गणीयली। संजीवनी जीवनाने। कशी किती अर्पियली।।' अशा ओळी वाचताना अतिशय साधेपणाने ही कविता मोहविल्याशिवाय राहत नाही. लताबाईंची कविता आशयाच्या बाजूने नेहमीच इतकी पारदर्शक राहील असे नाही. जाणून बुजून तिरकस आशय व्यक्त करण्याचा वेडा छंद या कवितेला नाही. जे जे सरळ साधे असते ते ते सारे खोटे व नकली असते, तिरकसपणा म्हणजे अस्सलपणा, अंधुकपणा म्हणजे जिवंतपणा असा या कवितेत आग्रह नाही. खरे म्हणजे आपण कविता आहोत असा या कवितेचा अट्टहासच नाही. आपण आहोत त्या रूपात ती संथपणे तेवणारी आहे. तुम्ही तिला कविता म्हणा अगर न म्हणा; ती स्वत:च्या विश्वात तृप्तपणे फिरणारी आहे. मात्र म्हणून ही कविता गूढ होतच नाही असे नाही. सहजगत्या तिच्यातील भाव गूढ होतात. गूढ होतानाच गडद होतात. 'लाभताच तू कळली। बाधा मज राधेची।' इथपर्यंत आपण सरळ येतो. कारण राधेची बाधा आपल्याला माहीत आहे. अनयाच्या बरोबर संसार करणारी पण कृष्णावर आपले सर्वस्व उधळणारी राधा हिला त्या अवैध प्रीतीची एक धुंदी असणे आपण समजू शकतो. पण या पुढची ओळ 'सीतेचा भाव शुद्ध। वेडी रति मीरेची।।' अशी आहे. राधा निदान कृष्णाच्या सहवासात एक धुंद जीवन जगत होती. मीरेच्या नशिबी तेही नव्हते. आपल्या जीवनाचे सर्व मधुर सौभाग्य तिने एका काल्पनिकावर उधळलेले आहे. पण ते उधळताना मीरेच्या उत्कटतेची धार अशी विलक्षण की ते काल्पनिक तिच्या जीवनात वास्तवाहून वास्तव ठरले. आणि जेव्हा मीरेसाठी तिचा गिरीधर नागर वस्तुस्थिती झाला त्यावेळी राधेला न मिळालेले समाधान कर्पूर । २९