पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कवितेचे यश

 ती मनात रुजण्यात,

 दीर्घकाळ

 मनात थांबण्यात असते.

  म्हणून कवितेचे

 स्वरूप कसे

 अत्तराच्या थेंबासारखे

 असायला हवे.

 एक थेंब

 सारे वातावरण दरवळून टाकतो.

 त्याप्रमाणे

 कविता सगळे मन भरून टाकते.