त्या शब्दांची गरज संपते. कविता ही एखादा मुद्दा ठाशीवपणे सांगणारी, एक तत्त्व मांडणारी, निषेध-संताप व्यक्त करणारी असू शकत नाही; कारण कवितेचे यश ती मनात रुजण्यात, दीर्घकाळ-मनात थांबण्यात असते. म्हणून-कवितेचे स्वरूप कसे अत्तराच्या थेंबासारखे असायला हवे. एक थेंब सारे वातावरण दरवळून टाकतो. त्याप्रमाणे कविता सगळे मन भरून-टाकते आणि अत्तर तासाभराने उडून जाते; कविता दीर्घकाळ रसिकाच्या मनात दरवळत-असते. कवितेचे हे सामर्थ्य तिच्या शब्दांत नसते. शब्द थोडे असतात. आठ-दहा ओळींत लघुकथेइतके शब्द असणार नाहीत. हे सामर्थ्य त्या कवितेतील आशयघन प्रतिमा आणि शब्दांच्यामध्ये असलेली सूचना यांत असते. ही सूचकता म्हणजे आडवळणाने सुचविणे नव्हे. तसे तर आपण रोजच्या बोलण्यातही अनेक गोष्टी सुचवीत असतो. “मला तहान लागली" या वाक्यात “प्यावयाला पाणी आणा” ही सूचना आहेच. कवितेतील सूचना उत्कृष्ट भावनेची असते. ही भावना. शब्दांत तर दिसत नाही पण वाचकांना मात्र सारखी जाणवते, मन भारावून टाकते. तुमच्या काही कविता हे काम करतात. इतर कविता एखादा निषेध, संताप व्यक्त करून थांबतात.
कवीने निषेध करायचा नसतो. कवीने संताप व्यक्त करायचा नसतो. याला जुन्या काळी असे म्हणत की, कवी अभिधान करीत नसतो. तो अभिनयन करतो. हा मुद्दा तुम्ही नीट समजून घ्या. मला राग आला, मला संताप आला ही वाक्ये कशी आहेत? ती बोलणाऱ्याच्या अनुभवाचे वर्णन करतात. याला अभिधान म्हणतात. ती ऐकणाऱ्याच्या ठिकाणी राग-संताप निर्माण करीत नाहीत. कवीचे काम “मला हसू आले' हे सांगण्याचे नाही. रसिक वाचकांच्या ठिकाणी हसू निर्माण करण्याचे आहे. तुमच्या कवितेने वाचकांच्या मनात आपल्या सामाजिक परिस्थितीविषयी तिरस्कार व चीड निर्माण केली पाहिजे. याऐवजी तुम्हीच आपला संताप, चीड व्यक्त करता. मग कविता हे लहान अगर मोठे व्याख्यान होते. हे जे शब्दांच्यामधून भावनांचे संक्रमण होते, त्याला 'अभिनयन' म्हणतात. आपल्या कवितेने वाचकांना अस्वस्थ करावे; पण - आपले शब्द अस्वस्थ होऊ नयेत, ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. वाचकांच्या ठिकाणी उत्कट भावना निर्माण करण्याचे जे शब्दांचे सामर्थ्य, त्याला या क्षेत्रात सूचकता म्हणतात.
आज दलित साहित्यातील सारी कविता कवीच्या चीड-संताप-प्रक्षोभाचे अभिधान करीत आहे, अभिनयन करीत नाही, असा माझा आक्षेप आहे. हा