( २१ )
धरिलें हैं घरघेणें ॥ १ ॥ या नांवें कृपासिंधु । ह्मणवितोसी दीनबंधु ॥
मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ २ ॥ अमळ दया नाहीं पोटीं । कठीण
तैसाचि कपटी ॥ आंधळयाची काठी । माझी गुदरसीच ना ॥ ३॥ तुकया-
बंधु ह्मणे पुरती । नाहीं ह्मण बरें अनंता ॥ एरवी असतां । तुझा घोंट
भरिला ॥ ४ ॥
॥ ८० ॥ काय सांग हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा ॥ गिळा-
यासी निमिषा । लोगों नेदावें ॥ १ ॥ माझे बुडविलें घर । लेक बाळे
दारोदार ॥ लाविली काहीर । तारातीर करोनी ॥२॥ जीव घ्यावा किंवा
धावा । तुझा आपुला केशवा ॥ इतुकें उरले आहे । भावाचिया निमियें
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे जग । बरे वाईट ह्मणों मग ॥ या कारणे परि लाग।न
सांडावा सर्वथा ॥ ४ ॥
|॥ ८१ ॥ मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी॥ तोही परि
हरी । तुज जाला असमाई ॥ १॥ हे कां भक्तीचे उपकार । नांदतें विध्वंसिलें
घर में प्रसन्नता व्यवहार । शेवटी हे झालासी ॥ २ ॥ एका जीवावरी । होत
दोनी कुटुंबारी ॥ चाळयूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥ ३ ॥ तुकयाबंधु
मणे भला । आणीक काय अणावें तुला । वेडा खाने केला ॥ तुजसवें
संबंधु ॥ ४ ॥
॥ २॥ पुर्वी पूर्वजांची गति । हेचि आइकिली होती ॥ संवे लावूनी
श्रीपती । निश्चिती केली तयांची ॥१॥ कां रे पाठी लागलासी । ऐसा
सांग हृषीकेशी ॥ अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हणू ॥ २ ॥
जन्मजन्मांतरीं दावा । आह्मां आपणां केशवा ।। निमित्य चालवा। काईसया-
स्तव हैं ॥३॥ तुकयाबंधु ह्मणे अदेखणा । किती होसी नारायणा ॥ देखों
शकवेना । खातयासी न खात्या ।। ४ ।।
॥ ८३ ।। निसुर संसार करून । होतों पोट भरून ॥ केली विवसी
निर्माण । देवपण दाखविलें ॥ १ ॥ ऐसा काढियेला नीस । काय म्हणे
सहित वंश ॥ आणिलें शेवटास। हाउस तरी न पुरे ॥ २ ॥ उरलों पालन्या
शेवटीं । तेही न देखवे दृष्टी ॥ दोघांमध्ये तुटीं । रोकडीचि पाहिली ॥ ३ ॥
बुकयाबंधु अणे गोड । बहु झालें अति वाड ॥ अणोनी कां बुड । मुळ्यां-
रहित खावें ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/62
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
