पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


वितो ॥ १।। ऐसे हैं कळले असाचें सकळां । चोर सा वेगळा नाहीं दुजा ॥ २ ॥ वैष्णव हे हेर तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥ ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे आले अनुभवसि । तेणेच आह्मांस नागविले॥ ४॥ ॥ ६८ ॥ बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥ १ ॥ एके घरी कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥ २ ॥ कान्हा ह्मणे कां रे निष्काम देखिलें। अणोनी मना आलें करितोसी ॥३॥ | ॥ ६९ ॥ धींदद तुझ्या करीन धींदड्या । ऐसें काय वेड्या जाणि- तलें ॥ १ ॥ केली तरी बरें मज भेटी भावास ! नाहीतरी नास आरं- भिला ॥ २ ॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें ॥ तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरी भीड कांहीं ॥ ४ ॥ | ॥ ७० ॥ भुक्ति मुक्ति तुझे जळो ब्रह्मशान । दे माझ्या आणीन भावी वेगीं ॥ १।। रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ २॥ नको आपुलिया ने वैकुंठासी । दे माझ्या भावासी अणुन वेगीं ॥ ३ ॥ नको होॐ कांहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ ४ ॥ तुकयाबंधु ह्मणे पाहाहो नाहीं तरी । इत्या होइल शिरीं पांडुरंगा ॥ ५ ॥ ॥ ७१ ॥ मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥ १॥ नको लावू आह्मां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचा- रूनी ॥ २ ॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे अइक्ये ऐक्यता वाढते अनंता दुःखें दुःख ॥४॥ ॥७२॥ नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळे तोंड ॥ १ ॥ मागतों इतुकें जोडूनियां कर । ठेऊनियां शिर पायांवरी ॥ २ ॥ तुह्म आह्मां एके ठायीं सहवास । येथे द्वैत द्वेष काय बरा ॥ ३ ॥ तुक- याबंधु ह्मणे बहुत बहुतां रीती । अनंता विनंती परीसावी हे ॥ ४ ॥ | ॥ ७३ ।। लालुचाईसाठी बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥ १ ॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येचिशी दृढ़ कास ॥ २॥ मज आहे बळ आळीचे सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझे ॥ ३ ॥ करुणारसे तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनी घेईन निज वस्तु ॥ ४ ॥