( १८ )
कान्होबा देवाशी भांडले ते अभंग.
॥ ३२॥ दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिवरें कंठ दाटताहे ॥ १ ॥
ऐसे काय केलें सुमित्रा सखया । दिले टाकोनियां वनामाजीं ॥ २ ॥
आक्रंदती बाळे करुणावचनीं । या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥ ३ ॥ काय
हैं सामर्थ्य नव्हते तुजपाशीं । संगै न्यावयासी अंगभूतां ॥४॥ तुज ठावें
आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥ ६॥ कान्हा
अणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥ ६ ॥
॥ ६३ ॥ सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा
तुझा ॥ १ ॥ पावलों आपुलें केलें लाहे रस । निर्दैव परिस काय होय ॥२॥
कष्टविलासी म्यां चांडाळे संसारीं । अद्यापिवरी तरी उपदेशीं ॥ ३ ॥
उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥ ४ ॥
॥ ६४ ॥ असो अतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती
येइल येथें ॥ १ ॥ करू कांहीं दिस राहे त सायास । झोंबों खा लागास
भावाचिये ॥ २॥ करितां रोदना बापुडे ह्मणती । परि नये अंती कामा
कोणी ॥ ३॥ तुकयाबंधु ह्मणे पडलिया वनीं । विचार तो मनीं बोलि-
ला हे ॥ ४ ॥
| ॥ ६५ ॥ चरफडे चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरा-
पाशीं ॥ १॥ कल्पतसे मज ऐसे हैं पाहातां । करावी ते चिंता मिथ्या
खोटी ॥ २ ॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकटचि सेवा होईल
हानि ॥ ३॥ तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनी निधाना ने
पवीजे ॥ ४ ॥
| ॥ ६६ ॥ नलगे चिंता आतां अनुमोदन होता । आलें मूळ भ्राता
गेला साचें ॥ १ ॥ घरभेद्या येथे आहे ते सुकार्नु । धारेत कवळून पाय
दोन्ही ॥२॥ याचें साचिया मुखें पडियेलें ठावें । नलगे साराचें मार्गे
पुढे ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या
विठ्ठला ॥ ४ ॥
॥ ६७ ॥ मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो ही सारी दोरी खेळ
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/59
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
