पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) रिती ॥ ध्रु० ॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भव- सागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनव- सले सकळां मूळ जय जय निधना ॥ २ ॥ विश्वभरा सर्वेश्वर जगदाधारा। चक्रधर करुणाकरे पावन गजेंद्रा ॥ सुखसागर गुणागर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यामूर्ति मनोहरा ॥ ३ ॥ गरुडासना शेषशयना नरहरीनारा- यणा ध्याना सुरवरहरगौरी ॥ नंदा नंदनवंदन त्रिभुवनभीतरी। अनंतनाम उसी अवतारांवरी ॥ ४ ॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृतांता ॥ उत्पत्तिपाळणपासून संहारण सत्ता । शरण तुकयो- बंधु तारी रिति बहुतां ।। ६ ।। ॥ ३० ॥ सकुमार मुखकमळ निजसार निर्मळ । सावळी मुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ॥ झळकति दिव्य तेजें देत माज पातळ । मिरवल मयूरपर्थे मुगुट कुंडलें माळ ॥ १ ॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा ॥ आरती करीन काया। ओवाळिन सुंदरा । जय० ॥ ध्रु० ॥ गोजिरें ठाणमान भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । स्हृदय ब्रह्मपद बाण शृंगारीं । गर्जति चरण वांकी कंठ कोकिलास्वरीं ॥ २ ॥ घवघवित उटी अंग बावन चंदनांची । लल्ला कस्तुरिची कास पिसांव- राची ॥ कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाऊले कुंकुमार्ची ॥ ३ ॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सल विश्व लाविलें ध्यान ॥ आश्चर्य देव करिती ऋषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥ ४ ॥ वणितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ॥ उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु अणे स्तवू मी काय किती ॥ ६ ॥ ॥ ६१ ॥ धन्य ते पंढरी धन्य भीमा तीर । धन्य सनकादिक वाळिती सुरवर ॥ १ ॥ धन्य धन्य वो तू विटे उभा श्रीहरी । गोपाळ सांवळा वा- ळिती नरनारी ॥ ध्रु० ॥ धन्य पीतांबर धन्य कौस्तुभ गळां । श्रीवत्सलछिन पदक शोभे गोपाळा ॥ २ ॥ धन्य ती कुंडलें माथां मोरपिसा वेंटी । हरिदास कान्ह्या वरवा जगजेठी ॥ ३ ॥