पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) नवनीत देखोनियां लावितो लाडी गोडी ॥ खुण एक पालवीं राजस डोळे मोडी ॥ अगमा निगमा नकळे याची खोडी ॥ बंधु तुकयाचा दास हात जोडी ॥ ३ ॥ == = = वासुदेव. ॥ ४३ ॥ मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु यासी दोघी नारी ॥ पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥ १ ॥ ह्मणउनी आलों या देशा । होत नाही तरी भुललों दिशा ।। दाता तो मज भेटला इच्छा । देउनि मारग दाविली सरिसा गा ॥२॥ सर्वे घेक्षनि चौघे जण । आला कुमर सुलक्षण ॥ कहे चुकवूनी कांठवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥ ३ ॥ पुढे भक्तीने धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य येती ।। स्थिर केली जी आचपळे होतीं । सिद्ध आणुनि लाविली पंथीं गा ।। ४ ।। केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ॥ धर्मे त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥ ५॥ होतों पीडत हिंडत गांव । पोट भरेना राहावया ठाव ॥ तो येणे अवघा संदेह । ह्मणे फेडि- येला तुकयाचा बांधव गा ॥ ६ ॥ ॥ ४४ ॥ गात वासुदेव मी ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका ॥ डोळे झांकुनि रात्र नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥ १ ॥ राम राम स्परा आधीं । लाहो कर गांड घाला मूळबंद ॥ सांडाव्या उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविदीं गा ॥ २ ॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय ॥ पुढे बालत्व पीडा रोग क्षय | काय भज- नासी उरलें तें पाहें गा ॥ ३ ॥ क्षणभंगुर नाहीं भरंवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा ।। न चळे बळ परेल मग फांसा । पुढे हुशार थोर आहे वोळसा गा ॥ ४ ॥ कहि थोडें बहुत सागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ॥ तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥ ६॥ विनवितों सकळ जनां । कर जोडुनि थोरां लाइन ॥ दान इतुकें द्या मज दीना । ह्मणे तुकयाबंधु राम सा गा ॥ ६ ॥ ॥ ४५ ॥ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अनून ॥ जागे होउनि