पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १२ ) पन्न । मंजुळ बोले हास्यवदना वो ॥ बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी वो ॥४॥ घटस्थापना केली । पंढरपूर महानगरीं वो । अस्मानी मंडप दिला। तिन्ही ताळांवरी वो ॥ आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरी वो ॥ आली भक्तिकाजा । कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥ ६॥ तेहतीस कोटि देव । चामुंडा अष्ट कोटी भैरव वो ॥ आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुपाव वो ॥ नारद तुबर गायन । ब्रह्मानंद करिती गंधर्व वो ॥ वंदी चरणरज तेथें । तुक- याचा बांधव वो ॥ ६ ॥ ॥ ४१ ॥ पविघ्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आ- जि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि हृदयीं धरा । आळस नका करू लाहान सांगत थोरां ॥१॥ या हो या हो वाइयानो निघाले हरी ।सिलं- घणा घेऊनी वेग आरत्या करीं । औवाळू श्रीमुख वंदू पाउलें शिरीं । आह्मां दैव आलें येथे घरच्या घरीं ॥२॥ अक्षय मुहूर्त औटामध्ये साधे तें । मग येरी गर्ने जैसे तैसें होत जाते ॥ ह्मणोनि मागे पुढे कोणी न पाहावें येर्थे । सांडी परतें काम जाऊ इरी सांगातें ॥ ३ ॥ बहुत बहुतां रीती चिर्नी घरा हैं मम । नका गई करू आइकाल ज्या कानीं ॥ मग हे सुख कधी न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागे होईल काहाणी ॥ ४॥ ऐसियास वंचती यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सय जाण निर्धार ॥ मग हे वेळ घाटका न ये अजरामर । कळले असों द्या मग पडतील विचार ॥ ५ ॥ जयासाठी ब्रह्मादिक झालेती पिसे । उच्छिष्टा कारणे देव जळीं झाले मासे ॥ अद्भुगी विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु ह्मणे आलें अनायासें ।। ६ ।। गवळण, ॥४२॥ पहा पहा सांवळा कैसा धीट गे । याच्या बोलण्याचा नये कवणा वीट ॥ ध्रु० ।। ह्मणतो माझी लपविली पिवळी गोटी ॥ उलट्या भवन्याची चारी लावी पाठी ॥ कंचोळी पहातो सोडुनियां गांठीं ॥ हृदयीं एकांत घालोनिया मिठी ॥ १ ॥ अवाचित माझ्या डोळ्यांत गेलें कण ।। फुकुनी काढिता वाटले समाधान ॥ शहाणा कानडा तुझा हा नारायण ॥ २ ॥