( ११ )
क्रोध देभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर ॥ यांचे तरी माहेरघर । पर-
पकार वैरी जैसा ॥ ४ ॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाही केला
आळस ॥ करू नये ते केले संतउपहास । अभक्ष तेही भक्षिलें ॥ ५ ॥
पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारी परधनीं ध्यान में घोलों नये
घडलें ऐसे अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥ ६ ॥ कायापर्ने
वाचाइंद्रियांशीं । सकळ पापांचीच राशी । तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी ।
आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥
| ॥ ३९ ॥ काय काय करितों या मना । परि नाइके नारायणा ॥ करू
नये याची करी विवंचना । पतना नेऊ आदरिलें ॥ १ ॥ भलतिया सर्वे
धांवे सैराट । वाट अडवाट देरे दरकुट ॥ न विचार कुहें कहीं कपट ।
घात बळकट मांडियेला ॥ २ ॥ न पुरती भ्रमणी दाही दिशा । सप्त ही
पाताळे आकाशा ॥ घाली उडी बळेचि देखोनी फांसी । केलों या देशा
पाहुणा ॥ ३ ॥ चेतवूनी इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम
क्रोध काळ ॥ दुरावली शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हैं।
॥ ४ ॥ आतां काय ऐसे करावे यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी ।।
तुकयाबंधु मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी झाली ॥ ५ ॥
दसरा.
॥ ४० ॥ सुंदर सुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो ॥ नागर
नागखोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ॥ विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती
तळपे कंठीं वो । कास पीतांबराचीं । चंदन सुगंध साजे उटी वो ॥ १ ॥
अतिवरवंटा बाळा । अली सुलक्षण गोंधळा वो ॥ राजस तेजोराशी । मि-
रवी शिरोमणी वेल्हाळी वो । कोटि विशशिप्रभा ।लोपल्या सकळा वो। न
कळे ब्रह्मादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥२॥ सावळी सकुमार । गोरी
शुजा शोभती चारी वो ॥ सखोल वक्षस्थळ । सुदाळ पदक झळके वरी वो॥
कर्दी क्षुद्र घटिका । शब्द करिताती माधुरी वो ॥ गर्जत चरणीं वांकी । अ-
भिनव संगीत नृत्य करी वो ॥३॥ अष्टांग मंडित काय । वर्णावी रूपठेवणी
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/52
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
