पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐसी निर्गुण ॥ आप पर न ह्मणसी माय बहीण । सासूमुनास लावूनी पाहासी भांडण ॥ ५॥ इतुकियावरी ह्मणे वैकुंठींचा राणा । होऊन गेले ते नये आणू मना ॥ आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल ह्मणे तुकयाबंधु कान्हा ॥ ६ ॥ नाटाचे अभंग. ॥ ३३ ॥ अगा ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका ॥ अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥ १॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा ॥ अगी बळिबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ २ ॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा ॥ अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥ अगा महेश्वरी महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वर्णं ।। ४ ।। अगा अंबऋपिपरंपरा । निरालंबा निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगी माहेरा दीनांचिया ॥ ६ ॥ अगा धर्मराया धर्मशीला । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा। सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥ अगर चतुर मुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा ॥ अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणी तुकयाबंधु ॥ ७ ॥ | ॥ ३४ ॥ उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी ॥ पाउले तरी समचि साजिरी । नाम तरी अनंत अतिगोड ॥ १ ॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रलें । पीतांबर उटी शोभे गोरेपणें । लोपली तेणें रवितेजें ॥ २ ॥ श्रवण कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ ॥ दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥ कडी कडदोरा वांकी वेला । बाह बाहुवढे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥ ४ ॥ सुंदरपणाची साम्यता । काय वर्णं ते पाच आतां ॥ तुकयाबंधु सणे रे अच्युता । धन्य ते मातापिता बसवली ॥५॥ ॥ ३६॥ एक मागणे हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी ॥ मज