पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ६ ) ॥ १३ ॥ उदार कृपाळ सांगसी जनी । तरी कां या रावणा मारियेलें ॥ निस निय पूजा करी श्रीकमलीं । तेणें तुझे काय केलें ॥ १ ॥ काय बडिबार सांगसी वायां । ठावा पंढरिराया आहेसि आह्मां ॥ एकलाचि जर देऊ परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ २॥ कर्णाऐसा वीर उदार जुझार । तो तुवां जर्जर केला बाणीं ॥ पडिला भुमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥ ३ ॥ श्रियाल बापुडें सात्विकवाणी । खादलें कापूनि साचें पोर ॥ ऐसा कठिण कोण होईल दुसरा । उखळ कांडविले शिर ॥ ४ ॥ शिबी चक्रवती करितां यज्ञयाग । याचें चिरिलें अंग ठायी ठायीं ॥ जाचउनि प्राण घेतला मागें । पुढे न पाहतां कांहीं ॥ ६ ॥ वलीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देऊनि माथां ।। कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्र कथा ॥ ६ ॥ हरिश्चंद्राचे राज्य घेऊनियां मर्च । चिकविला जीव डोंबा- घरीं ॥ पाडिला विघड नळा दमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरी ।। ७ ॥ आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपत्ति माउसीच्या ॥ वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । ह्मणे बंधु तुकयाचा ॥ ८ ॥ | ॥ १४ ॥ नेत्राची वासना । तुज पाहात्रे नारायणा ॥ ५ ॥ कीं याचे समाधान । काय पहातोसी अनुमान ।। २ ।। भेटावें पंढरिराया । हेंचि इच्छिताती बाह्य ॥ ३ ॥ ह्मणतों जानें पंढरीसी । हेंचि ध्यान चरणासी ॥ ४ ॥ चित्त ह्मणे पायीं । तुझे राहीन निश्चयीं ॥ ५ ॥ ह्मणे बंधु तुक- याचा । देवा भाव पुरवीं साचा ॥ ६ ॥ | ॥ १६ ॥ मन उताविळ । झाले न राहे निश्चळ ॥ १ ॥ दे रे भेटी पंढ- रियो । उभारोनि चारी बाह्या ॥ २ ॥ सवाँग तळमळी । हात पाय रोमावळी ।। ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे कान्हा । भूक लागली नयना ॥ ४ ॥ ॥ १६ ॥ अणसी दावीन अवस्था । तैसे नको रे अनंता ॥ १ ॥ होऊ- नियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ।। ३ । मृगजळाचियापरी । तेसे न करावें हरी ॥ ३ ॥ तुकयाबंधु मणे हरी । कामा नये बाह्वात्कारीं ॥ ४ ॥ ॥ १७ ॥ विठ्ठला रे तुझे वणितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध झाली पापें ।। १ । विठ्ठला रे तुझे पाहतां श्रीमुख । विठ्ठला रे सुख झालें नयना ॥ २ ॥ चिहृला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाया