पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बीतसे ॥ २ ॥ असुर तोडरी दैयांचा काळ । झाला द्वारपाल बळीचा तो ॥ ३ ॥ लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥ ४ ॥ तुकयाबंधु ह्मणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा | ॥ १० ॥ कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥ १ ॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वणला ३ दगा देउनि अवधियांला । सांठविलें अविनाश ॥ २ ।। केलें एके घरों केणें । भरलीं मदोदित दुकानें ॥ दुमदुमलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥ ३।। तुकयाबंधु ह्मणे किया । संतांचे हात दिल्या ॥ आंगावेगळे आपुल्या । टाकुन झाला महिमान ॥ ४ ॥ ॥ ११ ॥ पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ।। पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥ १ ॥ ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचे निर्मूळ । अळ्यकाळ आरंभला ॥ २ ॥ थोर या युगाचे आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ॥ सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥ ३ ॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । झोला बुडाला पर- मार्थ नाही झाली ऐसी नींत । हा हा भूत पतिले ।। ४ ।। शांति क्षमा दया । भाव भक्ति सात्क्रिया ॥ ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगिलें ।। ६ ।। राहिले वर्णाश्रमधर्म । अन्योन्य विचरती कर्म ॥ ह्मणवितां रामराम । श्रम महा मानिती ॥ ६ ॥ थेर भोरपाचे विशीं । धांवती भूलें आमिषां तैसीं ॥ कथा पुराण ह्मणतां सिसी । तिडीक उठी नकच्याचे ॥ ७॥ विषयलोभासाठीं । सवार्थेस प्राण साडी ॥ परमार्थी पीठ मुठी । भागतां उठती मुनींसीं ॥ ८ ॥ धनाढ्य देखोनि अनामिक । तयाते मानिती आवश्यक ॥ अपमानिले वेदपाठक । सात्विक शासन संपन्न ॥ ९॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ॥ सुनचिया दासी । सासा झाल्या आंदण्या ॥ १० ॥ खोटें झालें आली विवसी । केली मर्यादा नाहींसी ॥ भार्या भ्रतारेंसी । रंक तैसी मानिती ॥ ११ ॥ नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ॥ पोटासाठीं खौसा । वैदितीं मलिंछाच्या ॥ १२॥ बहुत पाप झालें उचंबळ । उसम न अणती चांडाळ ।। अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥ १३ ॥ कैसे झाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । दिडे घेऊनी आपण ।