पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/391

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


॥३॥ सुनीळ प्रकाशें उगवला दीन । अमृताचे पान जीवनकळा ॥४॥ शशी सूर्या झाली जीवें ओवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥ निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराला निश्चित निश्चितीनें ॥ ६ ॥ | ॥ १६६६ ।। सद्दज्ञाचि तुमची वंदिली पाउलें । तंव मी माझे हें हिरोनी घेतलें ॥१॥ भात कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावर तुमचा पांडुरंगा ॥ २॥ हे काय तुमासी बोलिलें विहीत । चोरोनियां घ्यावें आमुचें संचित ॥ ३ ॥ प्रालब्ध भोग जे द्यावयासी येती । अभिलाषुनी तेहि भोगितां श्रीपती ॥ ४ ॥ आतां क्रियमाण संग्रह जो करावा । तोहि वरच्यावरीं तुमीचि हरावा ॥५॥ अवधेचि अमुचें घेऊनियां अंतीं । जीवभाव तेहि बुडवावे पुढतीं ॥ ६॥ निळा ह्मणे सर्वस्त्रे उघडाच केला । तुमचिये संगती दैव हा लाधला ।। ७ ।। ॥ १५६७ ॥ शोधोनी अन्वय वंश वंशावळी । परंपरा कुळ उच्चारण ॥ १॥ ह्मणविलें पूर्वी जैसे होते तैसें । केलें सामरसे समाधान ॥ २ ॥ एक छत्र झळके उन्मनी निशाणीं । अनुहाताचा ध्वनी गगन गर्ने ॥३॥ निळया स्वामी स्थापी निजपद दासां । करुनी उल्हास आवडीचा ॥ ४ ॥ ॥ १५६८ ॥ होते तैसे पायीं केलें निवेदन । अंतरल दिन बहुत होते ॥ १॥ संचोखुन केले समाधान चित्ता । गरूनि भाता प्रेमरस ॥ २ ॥ नामरत्नमणी करूनि भूषण । अलंकारि मंडण माळा दिली ।। ३ ।। निळा ह्मणे तेणें सुखें झाला निरामय । नाम नाम सोय निमग्नता ॥ ४ ॥ ॥ १५६९ ॥ हाके सर्वे उडी । घालोनियां स्तंभ फोडी ॥ १॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाई वांचून ॥ २॥ करितां आठव । धांवानियां घाली कव ॥ ३ ॥ निळा ह्मणे गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥ ४ ॥ माप्त. || B BAY : ---[IRINT"El! AT THE " TATA-IVECHAKA" R३ ,