पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४७ ) ॥ १५५२ ॥ पाहों गेलियें वो नंदाचा नंदन । नेत्रि लेऊनियां आतिचें भजन ।। जेथे उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळउनी गडि संत सज्जन वो ॥ १ ॥ दृष्टि तेथे हि निवालि व इंद्रियें सकळ । जालियें तटस्थ चि देखोनियां घननीळ ॥ मुकुट विराजित कुंडले वनमाळ । सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥ २ ॥ शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी । देव्हडा पाउलिं वो मुरलि अधरीं ॥ वाजवितां सप्तस्वर उमटात माझारी । देखता देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥ ३ ॥ वेध वेधले वो ज्याचे विधाता हरिहर । इंद्रआदिकरुनी सकळहि मुरवर ॥ सिद्ध महामुनि योगि ऋपीश्वर । नारद तुंवरादी महानुभाव थोर वो ॥ ४ ॥ तेथे कोण पाड आझा मानवांचा । ज्याते न पुरति स्तावितां वेदाचा ॥ नकळे महिमा व याच्या स्वरूपाचा । नयानं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥ ५॥ रूप नागर वो सुंदर गोजिरें । चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणित नेपुरें । ऐकतां निजानंदा होतसे चे- ईरे । निळा ह्मणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥ ६ ॥ ॥ १५५३ ॥ मानेची माझिये वो संदेह फीटला । देव पाइँ जातां जव- ळिच भेटला ॥ अवघा मागें पु तो चि वो ठाकला । जनीं जना- र्दन भरोनियां दाटला वो ॥ १ ॥ पुलें जीवींचे आरत साजणी । पाहे जेथे तेथे दिसे चक्रपाणी ॥ लोक लोकांतरीं याचि चि भरणी । भरोनि उरला अवध्याचि वाणि खाण वो ॥ २ ॥ जाला सुकाळ हा सु- खाचा मानसा । पडिला त्रिभुवनं एकरूप ठसा ।। धरा व्यापुनियां अंबर दशादिशा । आतां भोगन मी सर्वकाळ ऐसा वो ॥ ३ ॥ नानाभूनाक़ात एकाच भासे । नानानामें आळवितां वो देतमे ॥ नाना अळंकार एकचि लेतसे । नागिवा उधडा ही बरवाच हा दिसे ॥ ॥ ४ ॥ नानावतें हा नेसला पांघुरला । जेथील तेथेचि हा बहुरंगें नटला ॥ शखें अशर्खे हा हाते मिरवला । सौम्य क्रूर ऐसा होउनियां राहिला वो ॥ ५ ॥ एका नीववी भोगवी नाना भोग । ऐका खाववि जेववि दावी जग ॥ एका विचरे देउनि अंगसंग । निळा ह्मणे हा एकलाचि अनंग ॥ ६ ॥ ॥ १६५५ ॥ नित्य श्रीहरीचे आठवते गुण । वदनीं याचिया वो नामाचे स्मरणे , हृदयीं धरुनियां निजभावें चरण । करितें अनुदिनीं हेंचि अनु- छान वो ॥ १॥ येथे आल्ये वो याचि निजकार्या । कली कर्मे ती मागील भोगाया ॥ अतां घ८ती तीं याते सम्पया । नाहिं भय त्या निजस्थाना