पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुटो कोणापाशीं । अणा नंदाचा नंदनु येकांतासीं । निळ्या स्वामिची है भावना निश्चयेसी च ।। ५ ।। | ॥ १५२९ ॥ देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वाचेल सुंदरा ॥ नका आड घालू संदेह दुसरा । लावा उठवुन जाउंद्या इतरा वो ॥ १।। ऐसे वलात या जीविच्या जिवलगा । झाला विरह गे वाचवा सुभगा ॥ आणा पाचारुनी ये एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंग वो २ ॥ आहे ठाउके हैं अंतरीं आम्हांसी । याचा वेध झाल्या दशाचि हे ऐसी ॥ होते आणि गे जीवा आणि शिवासी । तेथे देहबुद्धी नाठवे देहासी वो ॥ ३ ॥ हृदयीं होतांचि या कामाचा संचार । न्यावा एकांतासि निष्काम यदुवीर ॥ देईल मुख तोचि नाहीं ज्यासि पार । सांडा चावडी आणिक विचार वो ।। ४ ।। नाहीं अनुभव हा ठाऊका जयासी । साचि भोगती या अनुदिनीं दुःखासी ।। येति जाति पुन्हा होति कासाविसी । आम्ही न विसंवों या सावळ्या कृष्णासी वो ॥ ६ ।। नाहीं जीवीं या जीविताची चाड । याच्या संगसुखें घालू वो धुमाड ॥ स्वामी निळ्याचा पुरवील कोड । आणा तोचि तां सांडो बडबड बो 1} ६ ॥ ॥ १५३० ॥ झाला विरद्द हे नये देशावरी । देतां औषधे वो आणित पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथे थोरी । नानाउपायांच्या करितां भरोभरी वो ।। १ ।। आणा वेग तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नंदाचा कुमर ।। तया भेटत चि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥ एकी सखिया या येऊनि विनविती । एकी हरिचीया पायावरी लोळती ॥ एकी करुनि पंचप्राणाची आरती । म्हणति चला वेग एकांत को ।। ३ ॥ एकी घालिती इरीती चिंजणवारी । एकी देसी विडिया या सुंदरा ॥ एक वारीती बरी चन्या कुमारा । एकी अणती हरि चलायें मंदिरा वो ॥ ४ ॥ एक देती या चंदनाची उटी । एकी लावित कस्तूरी मळिवटी ॥ एकी घालिती या तुळसीमाळा कंठीं । ऐकी ह्मणती आता चलायें जगजेठी ॥ ५ ॥ ऐसा विनवूनी आणिला सकळ । एकोनि जीवीं ते सुखाव- बाळी । उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी । निळ्या स्वामि तीचे आर्त पुरवि तयेकाळीं वो ॥ ६ ॥ ॥ १५३१ ॥ झाला विरह अंतरीं कामिनीसी । नये सांगतां बोलतां