पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणावरी ॥ २७ ॥ पत्राचे उत्तर मागीतलें स्वामी । भेटी अंतर्यामी इच्छीताती ॥ २८ ॥ म्हणती निवृत्ति नाथ वाचा ज्ञानेश्वरा । तत्र ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥ २९॥ को पत्र वरे निवृत्ती बोलती। पाकाची निष्पत्ती होय तेथें ।। ३० ।। कोरे तें सोंवळे खरकटें ओवळे । धूतल्याही जलें शुद्ध नोहे ॥ ३१ ॥ कोरे ते निर्मळ स्वीकारीले जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥ ३२ ॥ कोरीया अक्षर उमटे कसोटी । रद्दीजाय हादी विकावया ॥ ॥ एकाक्षर ब्रह्म प्रणवाचे कुशी । नुचारे पराशि उच्चारीतां ॥ ३४ ॥ पावीजे अक्षर गुरुकृपावूणे । येराशीं उमाणे नुकतवे ॥ ३८ ॥ शणती बहूते करतां खटपट । अर्थ उप- राटा पडे तयां ॥ ३३ ॥ अक्षर परब्रह्म वेदा अगोचर । केचा अनुस्वार उमटला ॥ ३७॥ नचले जाणीव नचले शाहाणीव । तकानुरे टाव अक्षर हैं ।। ३८ ॥ पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सेर । अज्ञापले ऐसे निवृत्ति- नार्थे ॥ ३९ ॥ रेखीयेली पत्र लिखीत पासष्टी । पाहातां अर्थ दृष्टी तवीं पडे ॥ ४० ॥ परम गुह्या गुह्य उपनिपद भाग । कृपेचा प्रसंग में पा- दिला ॥ ४५ ॥ वाचीलीया अर्थ आणतां मानसीं । पाकीजे अनायास परमतत्व ॥ ४२ ॥ नकरितां यजन अध्ययन अध्यापन । नकारत साधन आत्मप्राप्ती ॥ १३ ॥ देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोप सांगावा विवराहे ।। ४४ ॥ येऊनीयां पत्र निवाले ब्राम्हण । बेदीले चरण पुढतो पुढनी ॥ ४५ ॥ आले तप्ततीरा नमीले सिद्धासी। वर्तमान त्यास निरोपिलें । '४६ ॥ म्हणती सिद्धराया पाहीलाजी महिमा । आंग निरूपम सामथ्र्याचा ॥ ४ ॥ अद्भतऐश्वर्य देखॐ लोचनीं । दधलें लेहोनी पत्र तुम्हा ॥ ४८ ॥ देऊनिया पत्र म्हणती द्विजवरा । देवाचे अवतार निःसंदेहे ॥ ४२ ॥ करुनियां पूजा पत्र वाचयेलें । तव गुह्य देखिले नचले युक्ती ॥ ५० ॥ मम म्हण अभिमान अद्याप नजळे । तिमिरे गेले डोळे नदिसे हित ॥५१ ।। कृत्रिम आचरणें दशा झाली ऐसी। विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥ ऐकतों श्रवणीं पाहावें लोचनीं । निश्चय तो मनीं दृढ केला ॥ ५३॥ अनुतापें उद्देश धरिला चांगदेवें । अळंकापुरा जावें सिद्धा भेटी ॥ ५४ ॥ तरीच सार्थक धरिलीया जन्माचें । नाहीं तरी काळाचे भातुकले ॥ ५५ ॥ नचुके ती जन्म चौन्यायसी यातना । काळा- सी वंचना कोठवरी ॥ ५६ ॥ पाचारिले सर्व पारपस अधिकारी । सांगती तयारी करावी यां ।। ५७ ॥ बहन सामग्राया सिद्ध करा वेगीं ।