पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिद्धपण त्यांचे आहे कीं वेचलें । पाहोनि यावें वहिले वेगावत ॥ १६ ॥ ते म्हणती स्वामीया मतांचे लक्षण । काय केसी खूण सांगा आम्हा ॥ १७॥ चर वेषा आम्ही पाहावे ते काय । अंतरीचे नव्हे विद्यमान ॥ १८ ॥ गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥ १९ ॥ एक वेडे मुके पंगु मुद्राहीन । चतुर वित्पन्न दिसती एक ॥ २० ॥ देहाच्या संबंधे दिसे देहाकृती । अवस्था भोगीती यथा काॐ ॥ २१ ॥ निद्रित नीजेमाजी जगोचि जागृतीं । स्वप्नी हि देखती नाना विध ॥२२॥ इंद्रियां वर्तवीती स्वभाव व्यापारीं । दीसती मंसारीं अतिदक्ष ।। २३ ॥ बाळक कौमार वृद्धाप्य तारूण्य । दिसती शक्तीहीन व्याधिग्रस्त ॥ २४ ॥ क्षुधा काळी अन्न प्रसादा ते घेत । तृषाकाळीं पीती जीवना ते ॥ २५ ॥ इतराचि सारिखे दिसती तेही जनीं । काय में पाहोनी यावे आम्ही ॥ २६ ॥ हांसती रूसती शिव्या देती एका । दिमती लौकीको मारिखेची ॥ २७ ॥ न चोजने आम्हा संताची निज खूण । मांगाचे लक्षण ते चि पाहों ॥ २८ ॥ आंगें संत तोची ओळखे सतासी । काय आणीकासी वर्म कळे ॥ २९ ॥ म्हणती चांगदेव साच है बोलिले । विचार नचले युक्ती तेथें ॥ ३० ॥ कायरे करावें पूसती शिप्यासी । ते ह्मणती सिद्धासी धाचे पत्र ॥३१॥ लेहोनि पत्रिका द्यावी यांचे हातीं । देऊन हे पाहती स्थियें- तर ॥ ३२ ।। पत्राचे उत्तर काय देती कैसे । अर्थिं अनायासे येईल कळों ॥ ३३ ॥ पत्र लीहावया वैसले एकांतीं । न चालेची युक्ती थोटा- बली ॥ ३४ ॥ अनामासी नाम अरूपासी रूप । कैसे लाऊ पाप कल्पनेचे ॥ ३५ ॥ चिरंजीव ह्मणो तरी विश्वात्मक । तीर्थरूप तरी बाळक दशा आंग ॥ ३६॥ न दीसे पूर्वी न लभेचि अक्षर । पडीयेला विचार न चले हात ॥ ३७॥ मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्तं चिंत- वणी पैठी झाली ॥ ३८ ॥ देखोनि सकळ प्राथती सिद्धासी । कां हे दशा ऐसी विपरीत ॥ ३९ ॥ ह्मणती चांगदेव कायरे लीहावें । मूळ न संभवे पत्रिकेचें ॥ ४० ॥ तरि ते ह्मणती देवा को पत्र पुरे । द्यावें अत्यादरें पाठऊनी ॥ ४५ ॥ युक्ती माजी दिसे बरवा हा सिद्धांत । सिद्धाईचा अर्थ गृढ़ गुह्य ॥ ४२ ॥ घालूनीयां घडी को पत्र देती । आणि उत्तर ह्मणती मग त्यासीं ॥ ४३ ॥ जाऊनियां तुह्मीं यावें शीघ्र- वल । करा दंडवत क्षेम सांग ॥ ४४ । चालीले तेथनी आले शिवपीटा।