पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/337

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ची रूप ॥ १ ॥ गमन शयन आसुन भोजनीं । देखति जनीं वन दृष्टीपुढे ॥ २ ॥ एकांती लोकांतीं घरं दारी बाहेरी । साविण निजाचारी नेणती दूजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे सर्व याचा हा परिवार । होउनी शाईधर ठेला घरीं ॥ ४ ॥ | ॥ १४५८ ॥ बोलती बोलणे चालत चालणें । करिती घेणे देणे पार तो ध्यानीं ॥ १ ॥ जेवीती जेवीण खेळती खेळणीं । मिरवती भूषण परि चित्त तेथे ॥ २ ॥ गीत गाती गीत विनोदी हांसुत । रोदनी आदत परि या कृष्णीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुखें भोगती नाना भोग । परि यांचे श्रीरंग ध्यानीं मनीं ।। ४ ।। ॥ १४५९॥ चित्ताचे चिंतनीं मनाचे मनन । जीवाचे जीवन कृष्ण यांचे ॥ १ ॥ वुद्धीचे बोधन श्रोत्राचे श्रवण । आमोद घेत घ्राणी कृष्ण मन ॥ २॥ देहीं देहभावा नेणती स्वभावा । इंद्रियांचा धावा कृष्णरूपी ॥ ३ ॥ निळा म्हणे यांचा वर्ततां व्यापार । अवघा शायर होऊनि ठेला ॥४॥ ।। १४६० ॥ बोलती चालती देखती ऐकती । सर्वत्र श्रीपति यांचे दृष्टी ॥ १ ॥ सासू माहेर सासू सासरा दीर। देखती या भ्रतार हरिच्या रूपें ॥२॥ सोयरे सजन इष्ट मित्र जन् । कन्या कुमरे धन कृष्ण गोत् ॥ ३॥ निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव । पधादिक सर्व झाला कृष्ण ॥ ४ ॥ । १४६१ ॥ पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झाली तयां ॥ १ ॥ माङ्या उपर माङया वैसती वैसणी । नाना अळंकार लेणी झाला कृष्ण ॥ २ ॥ मनीं त्यांचे कृष्ण ध्यानीं त्यांचे कृष्ण । श्रवण त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ।। ३ ॥ निळा म्हणे कृष्ण झाल्या कृष्णरूप । अवघ्या नाम रूप क्रियासहित ॥ ४ ॥ ॥ १४६२ । नाहीं त्यां ऊरले दुजें कृष्णे विण । बाह्य अतःकरण कृष्ण झाला ॥ १ ॥ जीवाचाही जीव शीवाचााहे शिव । देहीं देहभाव कृष्ण झाला ॥ २ ॥ शब्दो शब्दविता बोधा वधवीता । चित्ता चेतविता झाला कृष्ण ।। ३ ।। निळा म्हणे कृष्णे केलें कृष्णाकार । सुबाह्य अंतर रंग- बीलें ॥ ४ ॥ ॥ १४६३ ॥ मृदु मधुर वाजवीत वेणु । सावळा नंदनु नंदाचा ॥ १ ॥