पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/336

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २९५ ) ॥ १४५१ ॥ भावीक गोवळ । अंगीं विश्वासाचे बळ ॥ १ ॥ तेणे स्थरावली बुद्धी । निश्चळ झाली हारच्या पदीं ॥ २ ॥ नाहीं ओढा वारा । चित्तीं चैतन्याचा थारा ॥ ३ ॥ निळा ह्मणे इरिच्या संगें । करिती क्रीडा नाना रंगें ।। ४ ।।। ॥ १४५२ ।। पडतां चि ते वचन कानीं । धरती मनीं अयादरें ॥ १ ।। सुकृताच उत्तम फळे । आलीं एक वेळे ओदवोनि ॥ २ ॥ सुखीं सांठवलें सुख । हरिखा हरिख भेटला ॥ ३ ॥ निळा ह्मणे कल्प कोटी । पडली गांठी हरिसवें ॥ ४ ॥ | ॥ १४५३ ॥ हरिच्या पायीं विश्वासले। संवगडे झाले म्हणउनी ॥ १ ॥ दिवस राती नव्हतां तुटी । सांगती गोडी आलोलिका ॥ २ ॥ ब्रम्हानंदें खेळती खेळ । करिती कल्लोळ गीतवाद्ये ॥ ३॥ निळा म्हणे निर्भय चिते। नाणिती काळातें निज दृष्टी ॥ ४ ॥ ॥ १४५४ }} सांगीतली धरिती गोठी । आदर पोट भक्तांचा ॥ १ ॥ तया सन्मुख झाला हरि । संसार तमारी तिमिराचा ॥ २ ॥ निरनियां भ्रांतीमळ । केले निर्मळ सहवासी ॥ ३ ॥ निळा म्हणे झाला ऋणीं । चक्र पाणी याचा चि ॥ ४ ॥ ॥ १४५५ ॥ ज्याचा विश्वास जडला पाय । हरि वीण कांहीं नेणती ॥ १ ॥ त्याचा करी अंगीकार । निरसी अंधार ममतेचा ॥ २ ॥ सत्या- सय दाखवी तया । लावी आपुलीया निजसोई ।। ३ ।। निळा म्णे ऐसे चर्म । सांपडे मुगम एकनिष्ठा ।। ४ ।।। | ॥ १४८६ ।। एकनिष्ठ झाला भाव । अतां देव ते चि अगें ॥ १ ॥ ढूंढे याचीं करिती काई । सव ठायीं देव तयां ॥ २ ॥ ध्यान मनीं जनीं वनीं । मगटे लोचनी अहोरात्र ॥ ३ ॥ निळा म्हणे वियोग बातां । नेणती सर्वथा हरिभक्त ॥ ४ ॥ . गोपिकांचे प्रेम. - --- - । १४५७ ॥ श्रीकृरणस्वरूपा वेथल्या या नारी । देखत अंतरीं हैं