पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/331

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


कान्हो ह्मणती पाहिलें मन । सखे सज्जन तुह्मी माझे ॥ ३ ॥ निळा सणे देइन धणी । ऐसच चक्रपाणी ह्मणे तया ॥ ४ ॥ ॥ १४२३ ॥ आता माझ्या सहवासे रहा । होईल पहा कौतुक तें ॥ १ ॥ चला जाऊ मांडू खेळ । ह्मणती गोपाळ बहुत वरें ॥ २ ॥ खेळ हुतुतु वांदुनि गडी । पुढेहि परवाडि विडिदांडू ।। ३ ॥ निळा ह्मणे श्रीहरि शहाणा । नागवे चि कोणाडाया तळीं ॥ ४ ॥ | ॥ १४२४ ।। वियादांडू मांडित खेळा । मेळवुनि मेळा संवगडियांचा ॥ १ ॥ मुं मणोनियां मारात टोला । हांसति याला डाव घेतां ॥२ ।। धांवत एक ते उभे चि ठाकती । जिकोनियां मानिति आपण धन्य ।। ३ ।। निळा ह्मणे खेळ मोडरे गडिहो । कान्होबाचे पाहों पाये आतां ॥ ४ ॥ ॥ १४२५ ॥ येउनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता माने ॥ १ ॥ चला जाऊ घरा हरिसचे चालती । अानंदें नाचती भोंवताले ॥ २ ।। इंद्रादिकां देवां नाहीं तैसें सुख । अवलोकिती मुख गोविंदाचें ॥ ३ ॥ निळा सणे जन्म नाहीं तयां मरण । अवलोकिती सगुण रूपडोळे ॥ ४ ॥ | ॥ १४२६॥ घुमघुमिती मोहया नादें । पांवे छंद्रे वाजविती ॥ १ ॥ शिगें काहाळा गजर झाला । श्रीहरि शोभला समुदायें ॥ २ ॥ अंग चंदन बाणली उटी । कास ते गोमटी पितांबरें ।। ३ ।। निळा मणे केशर भाळीं । तेन वैवाळी मुगटाचे ।। ४ ।। । १४२७ ।। यारे गाडिहो घेऊ धणी । काला वदनीं श्रीहरिचा ॥ १ ॥ सांनियां आभिमान दुरी । नाच फेरी गोविंदा ॥ २॥ देखोनि भाव अंतरींचा । देईल हातींचा विभाग ॥ ३॥ निळा ह्मणे ब्रह्मरस । उरले शेष हरिचे ते ॥ ४ ॥ ।। १४२८ ॥ कावडी भरुन आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारे नवनीते ॥ १ ।। ओदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥२॥ भोवने गोपाळ मध्ये हरी । दाविती कुसरी नृसाची ।। ३ ।। निळा ह्मणे ब्रह्मनंदु । लोटला सिंधु क्षीराचा ।। ४ ।। ।। १४२९ । मोहन्या पांवे तलालोरी । नाचती गजरी गीत गाती