( २८५ )
नियां गेलें शब्दाचे बोलणें । पवनूचि प्राणे शोपीयेला ॥५॥ निळा
सुखासुख पावला विश्रांती ॥ पदपिंडा समाप्ती करूनीयां ॥ ३ ॥
॥ १३९२ ॥ नीत नवा प्रेमी कृपेचिया बळे । अंतरीं हा बोले नंदघन
॥ १ ॥ नाचती मयूरे रोमांचीत दी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥ २ ॥
आकाशे दुमदुमी गर्ने अनुहत । सुनील तळपत विद्युल्लता ॥ ३ ॥ पिकली
भूमीको बीज अाले फळ । अद्य निजकळा संवगीलें ॥ ४ ।। भाग्यवंत
निळा सांडवी नीराळी । आत्माया जवळी निकटवासे ॥ ६॥
| ॥ १३९३ ।। वेडा नव्हे मुका चतुर शाहणा । बोले अबोलणा
मौन्यावस्था ॥ १ ॥ विष्णुदास निळा नाचे विदेहता । अंगीं सप्रेमता
आवडीची ।। २ ।। हृदई चतुर्भुज मेघशाम मूर्ति । मुखीं नामकीर्ति ब्रीदावळी
॥ ३ ॥ नेणता ह्मणोनी संत अपंगीला। निळा निरवीला पांडुरंगा ॥ ४ ॥
॥ १३९४ ॥ प्रवृत्ति निवृत्तीचे नियां भाग । उतरिले चाँग रमा-
यण ॥ १ ॥ ज्ञानाग्नि हुताश कडस वोजी । आत्मसिद्धी काजा
लागुनिया ॥ २ ॥ ब्रम्हरस ब्रम्ही सिद्ध झाला पाक 1 घेतला रुचक प्रतीति
मुखीं ॥ ३ ॥ स्वानुभवें आंगीं झाला समरम । साधन निजध्यास ग्रासोग्रास
॥ ४ ॥ आरोग्यता निळा पावला अष्टांग । मीरवला रंग निजात्मरंग ॥५॥
| ॥ १३९५ ॥ जाणीवच माझी गिळूनी ठेला । नेणवितें प्याला निपटु-
नियां ॥ १ ॥ निदळवाणे मज करूनी ठेविलें । जीवाचेही हरिलें जीवपण
॥ २ ।। ज्ञानासी तो हा वादचि नेदी आसील्या उपाधी परमार्थीका
॥ ३ ॥ निळा म्हणे येणे नेलें आपपर । मोडीयेली थार दोहींकडे ॥ ४ ॥
| ॥ १३९६ ॥ नेटकेंचि दैव उघडलें आजी । तोहा मनमाजी संचरला
॥ १ ॥ आत कैसे कहूं मी यासी । नावरेची मनासी आवरितां ॥ २ ॥
सुदीन घटीका सांपडली होती । ते पडली आवचिती हात याचें ॥ ३ ॥
निळा म्हणे मी मन माझे । हिरोनियां वोझे नेलें सकळ ॥ ४ ॥
| ॥ १३९७ ॥ उर्गेची आतां वैसेन मी ह्मणे । तंव हा करण चेष्टवीतो
। १ ।। दृष्टीपुढे हा उभाच ठाये । ऐकणे होऊनी रहे श्रोत्रबिळ ॥ २ ॥
मनही नेऊनी लपउनी ठेवी । चित्तात हा गावी आपणापासीं ॥ ३ ॥
निळा ह्मणे बाई हृदयच राहिला । अवघाचि रोधीला जाग येणें ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/326
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
