पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ( २८३ ) विभीषण । त्यासि लंकापति करुनि पूर्ण ।। स्थापिला चिरंजीव पद देऊन। अर्थदान या दीधलें ॥ ४ ॥ शुकसनकादिक ज्ञानें । अनुसरले आत्मचिं- तनें । यांसि देउनियां निजात्मज्ञान ॥ जीवन्मुक्तपदीं बैसविले ॥ ६ ॥ चर्तुविधा भक्ति चारी भक्त । तुमचे कुपे परम मुक्त ॥ उपमन्या क्षुधा आळवीत । तया क्षीरसिंधु दीधला ॥ ६ ॥ धुर्वे केले तुमचे स्तवन । मागे बैसावया निजस्थान ॥ तयातें ध्रुवपद बैसवून । केला वरिष्ठ सक- लासी ॥ ७ ॥ सुदामदेव तो लाचारी । तीनचि मुष्टी पाहे हरी ॥ तेची धालुनियां मुखाभीतरी । सुवर्ण नगरी दिधली या ॥ ८॥ स्तंभ प्रल्हाद पाचारी । तत्काळ प्रगटोनियां नरहरी ॥ हिरण्यकश्यपाते विदारी । अाण कुरवाळी निजभक्ता ॥ ९॥ निळा ह्मणे ऐशी कीर्ति । केली चारित्रे श्रीपती ।। अपार हरिभक्ता अपार इस्तीं । अपार दिधलीं वरदानें ।। १.० ॥ ॥ १३८२ ॥ एका नामें बहुत तरले । एका भावें जे अनुसरले ॥ एका तुमतेंचि ते पावले । एकाएक गोविंदा ॥ १ ॥ एका जाणोनियां तुमतें । पका रुसले अहंकारातें ।। एका विसरोनियां संसारातें । एका सुखाने पावले ॥ २ ॥ एका तुमच्या निजध्यासें । एकाचि तुमच्या नामघोपें ।। एका तुमच्या कृपाले । आपणा ऐसे तुली केले ॥ ३ ॥ एका तुमच्या कीर्तमेळे । एका तुमच्या भावबळे । एकाएकि चि उठोनि पळे ॥ पाप सगळे गोविदा ॥ ४ ॥ निळा ह्मणे एकाएक । स्मरणमात्रे चि झाले सुखी ।। एका नामोच्चारें मुख । वैकुंठलोक वैसविलें ॥६॥ ॥ १३८३ ॥ विठ्ठलनामें विट्ठल झाले । देहभाव विसरुनि गेले ॥ १ ॥ सर्वकाळ विठ्ठल चित्तीं । ब्रह्मानंदें ते इल्लती ॥ २ ॥ विठ्ठल ध्यानीं मनीं जर्नी । विठ्ठल लोचनीं चिंतनीं ॥ ३ ॥ निळा सणे भोग या । विठ्ठल तया जहला आंगीं ॥ ४ ॥ | ॥ १३८४ ।। नाम वाचे आठविलें । रूप मनीं सांठविलें ॥ १ ॥ आतां फिरूनियां घरा । येशी आपणचि माघारा ॥ २॥ लाविला मोकळ । भाव मागे सर्व काळ ॥ ३ ॥ निळा अणे आतुडलें । घरे वर्म हाता आलें ॥ ४ ॥ | ॥ १३८५ देखती ते विठ्ठलरूप । वाचे विठल नाम नप ॥ १ ॥ तेही विह्वलचि झाले अगें । मोह ममता विषय त्यागें ॥ २ ॥ विठ्ठल कीती