( २८१ )
॥१३७३ ।। सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥
स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघा ही आत्माराम ॥ २ ॥
आपलाचि सादु अंतराळ जेवीं । दुजें नवीन दावी दुजेपण ॥ ३ ॥ लटिके
ऋणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥४॥ स्वप्नामाजी
जेव नाना परिवार । अवोध साचार एकला चि ॥ ५॥ निळा अणे रज्जु
भासे सर्पपणें । झकवीलें तेणें नेणतीया ॥ ६ ॥
देवप्राप्ति,
•---
+
--
॥ १३७४ ।। जीवाचा ही जीव ते चि प्राणांचा प्राण । नयनाचे हि नयन
सूचि प्राणाचे घाण ।। १ ।। सर्वहि इंद्रियभाव हो चि माझे श्रीहरी । तुजविण
न दिसे पाहतां मज मी माझारी ।। २ ॥ चित्ताचे हि चित्त तू चि मनाचे
मन । श्रवणाचे हि श्रवण तू चि रसनेची रसना ॥ ३ ॥ निळा ह्मणे तू चि
माझा सर्वहि व्यापक । देहादेहीं शोधुनि पाहतां न दिसे आणिक ॥ ४ ॥
| ॥१३७५सकळाचिया नेत्रे तुम्ही सर्व ही देखणें । सकळांचिया श्रोत्रे
तुम्ही सर्व ही ऐकणें ॥ १ ॥ ऐसे सर्वज्ञ चि तुह्मीं सर्वदा देवा । जेथिल तेथे
क्याच्या तैशा जाणतसा भावा ॥ २ ॥ सकळांच्या ही रसना सर्च ही रस
सेवितां । सकळांच्या ही चरणें लंडुनि जातां दिगंता ।। ३ ।। निळा ह्मणे
सकळांच्या हि जीवाचे जीव । होउनियां लिप्त सेवी रूप ना नांव ॥ ४ ॥
।। १३७६ ॥ ऐशा परि नमन माझे पदारनाथा। तू चि होउनि तुजमाजि
झालों मी सरता ॥ १॥ न ये कळों कहीं अत एकानेक भाव । तुजमाजि
मी ही मजमाजि तू सर्व ॥ २ ॥ नाम रूप तू चि माझे क्रीया कर्तव्य । कायिक
वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥ ३ ॥ निळा ह्मणे मी तुं उपाधी
सारुनियां परती । राहों जैसे होतों तैसे निजरूप एकांतीं ॥ ४ ॥
| ।१३७७ ॥ ऐसा नीळा नित्यानंदीं निमग्न केला । देऊनीयां नामस्म-
रण चरण स्थापीला ॥ १ ॥ तेणें ब्रह्मानंदै गर्ने नाम वैखरी । आठवूनी
रूप तुमचे हृदय मंदिरीं ।। २ । नेणे अपपर नेणे जन विजन । नेणोनीयां
कांहिं चि नुरवी देहाचे भान ॥ ३ ॥ निळा ह्मणे हा चि माझा ऐश्वर्य भोग ।।
काया वाचा मानस अबधा पांडुरंग ॥ ४ ॥
5
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/322
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
